39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीकौसडी जि.प.शाळेत शिवजयंती निमित्त पुस्तक वाटप

कौसडी जि.प.शाळेत शिवजयंती निमित्त पुस्तक वाटप

कौसडी : जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये दि.२७ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हजरत टिपू सुलतान युवा मंचच्या वतीने शहीद गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता? या पुस्तकांचे स.पो.नि.सरला गाडेकर व मुख्याध्यापिका सुनिता गाजरे, ह.टिपू सुलतान युवा मंचचे जिल्हाध्यक्ष शेख नईमोद्दीन कौसडीकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सुनीता गाजरे होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर होत्या. हजरत टिपू सुलतान युवा मंच महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवत आहे. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शहीद गोविंद पानसरे यांनी लिहिलेले शिवाजी कोण होता? या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम दरम्यान सपोनि. गाडेकर यांनी विद्यार्थ्यांना १०वीच्या परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे असा अनमोल संदेश दिला.

मुख्याध्यापिका गाजरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन डी व्ही कुलकर्णी यांनी केले. तर आभार गणेश काळे यांनी मानले. या कार्यक्रमात शिक्षक गजानन पांचाळ, मनोज भालेराव, शिक्षिका मीरा कुंभारे, सुरेखा खरटमोल, सपना वैद्य, हाजरा शेख, उषाबाई शेळके यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR