34.1 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeअंतरराष्ट्रीयअडीच कोटींच्या बदल्यात ९०० जणांची यूएईच्या तुरुंगातून सुटका

अडीच कोटींच्या बदल्यात ९०० जणांची यूएईच्या तुरुंगातून सुटका

दुबई : १० मार्चपासून रमजान महिना सुरू होत आहे. यापूर्वी भारतीय उद्योगपती फिरोज मर्चंट यांनी यूएईच्या जेलमधून ९०० भारतीय कैद्यांना सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी तब्बल २.५ कोटी रुपये दान केले आहेत.

इस्लाममधील पवित्र महिना रमजान नम्रता, मानवता, क्षमा आणि दयाळूपणाचा महिना म्हणून ओळखला जातो.

विशेष म्हणजे कैद्यांच्या सुटकेसाठी इतकी मोठी रक्कम दिली जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. मागील काही वर्षात फिरोज यांनी तब्बल २० हजारहून अधिक कैद्यांची सुटका केली.

दुबई येथील ६६ वर्षीय फिरोज मर्चंट हे भारती व्यावसायिक आहेत, जे प्युअर गोल्ड ज्वेलर्सचे मालक आहेत. फिरोज हे आपल्या परोपकारी कामासाठी खासकरून जेलमधून कैद्यांना सोडवण्यासाठी ओळखले जातात. फिरोज जेलमध्ये बंद कैद्यांचे कर्ज फेडतात आणि त्यांना स्वदेशात परत जाण्यासाठी त्यांच्या विमानांच्या तिकीटांची देखील व्यवस्था करतात.

यूएईच्या जेलमधून ९०० भारतीयांची सुटका करण्याबाबत फिरोज मर्चंट यांच्या कार्यालयाने निवेदन जारी केले आहे. यामध्ये दुबई बेस्ड भारतीय उद्योगपती फिरोज मर्चंट यांनी अरब देशांच्या कारागृहातील ९०० कैद्यांची सुटकेसाठी तब्बल २.२५ कोटी दान केल्याचे सांगण्यात आले.

२००८ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या फॉरगॉटन सोसाइटी अंतर्गत फिरोज मर्चंट यांनी संयुक्त अरब अमीरातच्या जेलमधील ९०० कैद्यांना बाहेर काढण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. यामध्ये अजमानचे ४९५ कैदी, फुरैराहचे १७० कैदी, दुबईचे १२१ कैदी आणि इतर ६९ कैद्यांच्या सुटकेचा समावेश आहे. रास अल खैमा येथील २८ कैद्यांना देखील कारागृहाबाहेर काढण्यात आले आहे.

झोपडपट्टीतून कोट्यधीश बनण्याचा फिरोज मर्चंट यांचा प्रवास खास आहे. त्यांचे वडिल गुलाम हुसैन एक रियल इस्टेट ब्रोकर होते. तर त्यांच्या आई मालेकाबाई एक गृहिणी होत्या. ११ सदस्य असलेल्या कुटुंबात हुसैन हे एकमात्र कमवते होते. गुलाम हुसैन यांचे संपूर्ण कुटूंब मुंबईतील भेंडी बाजार येथील इमामवाडा वस्तीत राहत असे.

३००० कैद्यांची सुटका करणार
फिरोज मर्चंट यांनी म्हणणं आहे की, या मिशन संयुक्त अरब अमीरात त्यांना परिवारांशी पुन्हा भेटण्याची संधी देते ही गोष्ट लक्षात ठेवून सुरू करण्यात आले आहे. त्यांच्या प्रयत्नामधून २०२४ मध्ये ३००० हून अधिक कैद्यांची सुटका करण्यात येईल आणि त्यांना आपल्या कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल, फिरोज मर्चंट यांच्या या प्रयत्नांना दुबई येथील प्रशासनाने मंजूरी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR