Homeलातूरग्रामदैवत श्री निळकंठेश्वर मंदिर उभारणीस वेग

ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर मंदिर उभारणीस वेग

निलंगा : प्रतिनिधी
निलंगा शहराचे ग्रामदैवत आणि शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र निळकंठेश्वर मंदिराच्या नूतनीकरण व भव्य उभारणीच्या कामास वेग आला असून मंदिराच्या प्रत्यक्ष थर लावण्याच्या कार्यास भाजपाचे प्रदेश सचिव तथा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.
श्री क्षेत्र विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, पंढरपूरच्या धर्तीवर उभारण्यात येत असलेल्या या मंदिराच्या बांधकामाची निलंगेकर यांनी पाहणी केली. पुरातत्त्व विभाग, नांदेड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बोलताना अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले की, श्री निळकंठेश्वर मंदिर हे निलंगा शहराच्या श्रद्धा, संस्कृती आणि अध्यात्मिक परंपरेचे केंद्र असून, मंदिराच्या उभारणीमुळे निलंगा शहर धार्मिक व सांस्कृतिक नकाशावर अधिक ठळकपणे ओळखले जाईल. मंदिराचे काम गुणवत्तापूर्ण व वेगाने सुरू असून, हे पवित्र कार्य लवकरच पूर्णत्वास जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, नगराध्यक्ष संजय हालगरकर, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, नगरसेवक मुकेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, गटनेते वीरभद्र स्वामी, हरिभाऊ सगरे, ईश्वर पाटील, धर्मप्रकाश निंबाळकर, सुधाताई वाघमारे, सचिन गायकवाड, गणेश पेठकर, शहराध्यक्ष रवी फुलारी, दत्ता मोहळकर, सुमित इनानी, तम्मा माडीबोणे, शरद पेठकर, तानाजी बिरादार, चंद्रकांत होरे, किशोर लंगोटे, पिंटू पाटील, पिंटू पांचाळ, गौरव आर्य,
भगवान बाहेती, सुधीर पाटील, रवी कांबळे, राहुल कांबळे व रजनीताई सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी, शिवभक्त व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR