36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeलातूरचारा टंचाईतही पशुधनाची जोपासना

चारा टंचाईतही पशुधनाची जोपासना

लातूर : प्रतिनिधी
श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त आयोजित पशु प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात सहभागी झालेले उत्कृष्ट पशु पाहून या पशुंचे चारा टंचाईच्या काळातही उत्कृष्ट पालन, पोषण करणा-या पशुपालकांचे जिल्हाधिका-यांनी यावेळी कौतुक केले. यात्रा महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग, लातूर पंचायत समिती व श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या संयुकत  विद्यमाने  दि. १९ मार्च रोजी पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या पशुप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या हस्ते  झाले. याप्रसंगी तहसीलदार सौदागर तांदळे, देवस्थानचे प्रशासक सचिन जांबुतकर, व्यंकटेश हालिंगे, विशाल झांबरे,ओम गोपे, बच्चेसाहेब देशमुख यांच्यासह पंचायत समिती व पशुवंर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी उपस्थित अधिका-यांकडून चारा टंचाईची माहिती घेतली. यावर्षी पर्जन्यमान कमी असल्याने चारा टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.अशा स्थितीतही पशुपालक नेटाने पशुंची जोपासना करीत असल्याबद्दल त्यांनी पशुपालकांचे कौतुक केले. या प्रदर्शनात देवणी नर एक वर्षाखालील वासरे गट, देवणी नर एक वर्षावरील वासरे गट, देवणी नर दोन दात वळू गट, देवणी नर चार दात वळू गट, देवणी नर सहा दात वळू गट तसेच देवणी मादी गटातून देवणी मादी एक वर्षाखालील वासरे गट,देवणी कालवड एक वर्षावरील गट,देवणी गाभण कालवड गट, देवणी गाभण गाय गट, देवणी गाय दुधाळ गट तर लालकंधारी नर गटातून लालकंधारी नर एक वर्षाखालील वासरे गट, लालकंधारी नर एक वर्षावरील वासरे गट, लालकंधारी नर दोन दात वळू गट,लालकंधारी नर चार दात वळु गट, लालकंधारी नर सहा दात वळू गट,लालकंधारी मादी गटातून लालकंधारी मादी एक वर्षा खालील वासरे गट,लालकंधारी कालवड एक वर्षावरील गट, लालकंधारी गाभण कालवड गट,लालकंधारी गाभण गाय गट, लालकंधारी गाय दुधाळ गट,संकरित मादी गटातून संकरित मादी एक वर्षा खालील वासरे गट, संकरित कालवड एक वर्षावरील गट,संकरित गाभण गाय गट, संकरित गाय दुधाळ गट तर म्हैस गटातून नर व मादी अशा दोन गटातील जवळपास दिडशे पशु या प्रदर्शनात सहभागी झाले होते. अधिकारी व कर्मचा-यांच्या निवड समितीने प्रदर्शनातील उत्कृष्ट पशुंची निवड केली. प्रत्येक गटातील पशुधनास प्रथम, द्वितीय, तृतीय तसेच अ, ब, क, ड याप्रमाणे बक्षिसांचे वाटप करण्यात आले. बक्षिसाची रक्कम आरटीजीएसद्वारे संबंधित पशुपालकाच्या खात्यावर वर्ग करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR