लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथील शेतकरी राहुल व्यंजने यांनी तलाठ्याच्या त्रासाला कंटाळून तलाठ्याच्या विरोधात बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तलाठ्याने परस्पर दुस-याच्या नावे जमीन केल्याचे हे प्रकरण आहे.
शेतकरी राहुल व्यंजने यांची वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणी नंतर तलाठ्याने परस्पर शेतजमिनीचा कांही भाग एका सावकारच्या नावे फेरफार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकारणी संबंधित तलाठ्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे तर चौकशी समितीनेदेखील तलाठ्याला दोषी ठरवले आहे. मात्र संबंधित तलाठ्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट तलाठ्याकडून त्रास दिला जात आहे. त्यामुळे राहूल व्यंजने यांनी तलाठ्याच्या विरोधात येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. आता याप्रकारणी जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















