39.2 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeपरभणीत्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी कडक कारवाईची मागणी

त्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी कडक कारवाईची मागणी

मानवत : ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवू अशी जाहीर धमकी देणा-या विरुद्ध शासनाने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मानवत येथील ब्राह्मण महासभेने केली आहे. या संदर्भात दि.१ रोजी मानवत येथील ब्राह्मण महासभेने तहसीलदार यांना निवेदन दिले. यावेळी सर्व ब्राह्मण समाज बांधवांनी काळ्याफिती लावून घटनेचा निषेध केला.

या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यु ट्यूबवर एका अज्ञात इसमाने उघडपणे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संपूर्ण ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकणार असल्याची धमकी दिली आहे. सदर इसमाने ५ पेक्षा अधिक लोकांना गोळा करून झुंडशाहीच्या माध्यमातून ब्राह्मण समाजाला संपविण्याचा मानस व हेतू उघड केला आहे. त्यामुळे हा सुनियोजित व्यापक कट असल्याचे दिसून येत आहे. या कटाद्वारे ब्राह्मण समाजाचे सामुहिक हत्याकांड होण्याचा धोका उत्पन्न झाला आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक असलेल्या ब्राह्मण समाजाच्या मानवाधिकारांचे हनन होत आहे. तसेच ब्राह्मण समाजाविरुद्ध इतर समाजात वैमनस्य निर्माण करण्याचे कृत्य हेतुपुरस्सरपणे केले आहे.

सदर घटनेचा तपास करू अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन ब्राह्मण समाजाची सामुहिक हत्या घडवण्याचा कट कारस्थान करण्यामध्ये सहभागी सर्व दोषींविरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करून ब्राह्मण समाजाला जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण देण्यात यावे. तसेच भविष्यात असे प्रकार होऊ नयेत म्हणून सक्षम पावले उचलण्यात यावीत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच परळी वैजनाथ येथे दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजक व स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. संयोजक धर्माधिकारी यांच्यावर जाणीवपूर्वक दाखल केलेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर अ‍ॅड. अनिरुद्ध पांडे, श्याम झाडगावकर, प्रसाद जोशी, स्वप्नील गुंडू, चंद्रगुप्त भंडारी, विठ्ठल पेडगावकर, अ‍ॅड.लक्ष्मीकांत पांडे, सुनील दत्त भरड, गणेश गुरु बोरगावकर, अशोकराव मानोलीकर, राजेश अंबेकर, धनंजय गाजरे, संजय भोगावकर, नंदू बोरगावकर, दिलीप पाठक, सितू पांडे, मुकेश दलाल, योगेश्वर जोशी, बाळासाहेब कुलकर्णी, विजयकुमार दलाल, आनंद भरड, किशोर भरड, शिवाजीराव जोशी, दिलीप भरड, श्याम रणसिंग, राजेश गुंडू, गोविंदराव आचार्य, गजानन आंबेकर, धनंजय कुलकर्णी, अशोकराव जोशी, हनुमंत कुलकर्णी, अशोक कुलकर्णी, सुहास नाईक, के. जे. भरड, कृष्णा पेडगावकर, रमेश उन्हाळे, महेश गाजरे, संजय जोशी, नंदू बोरगावकर, दुर्गादास उन्हाळे, आनंद भरड, गणेश भरड, चिन्मय बोरगावकर, अजय कोकीळ, आशु पांडे, मोहनराव कुलकर्णी, सुनील उन्हाळे, अ‍ॅड.अरुण खारकर, अविनाश रामपुरीकर, अ‍ॅड.अमोल जोशी, राहुल दलाल, सागर कुलकर्णी, संतोष कुलकर्णी आदी समाज बांधवांच्या स्वाक्ष-या होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR