34 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeपरभणीमहिलांनी प्रत्येक व्यवहारात सक्षम बनावे : डॉ. सारीका लोहाना

महिलांनी प्रत्येक व्यवहारात सक्षम बनावे : डॉ. सारीका लोहाना

परभणी : आर्थिक बचतीबाबत खूप सारे मार्ग आहेत. यात म्युच्युअल फंड, एलआयसी पॉलिसी, एलपीसी फंड, डिजिटल गोल्ड सेविंग इतर बँकिंग व्यवहार, बँकेत करावयाच्या गुंतवणुकीचा कालावधी किती व कसा असावा याबाबतीत महिलांना मार्गदर्शन करून प्रत्येक व्यवहारात महिलांनी सक्षम बनले पाहिजे. सर्व व्यवहाराचे स्वत: नियोजन करून स्वत:च व्यवहार हाताळावे प्रतिपादन महिला सक्षमीकरण तज्ञ डॉ. सारिका लोहाना यांनी केले.

ज्ञानसाधना प्रतिष्ठान परभणी येथे सावित्री मंचच्या वतीने महिलांचे सक्षमीकरण या विषयावर जागतिक महिला दिनानिमित्त मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. लोहाना बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापिका एस. आर. रोडे, कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून तज्ञ मार्गदर्शिका डॉ. सारिका लोहाना (पर्सनल फायनान्स एक्स्पर्ट, लाईफ कोच अँड एन. एल. पी. मास्टर ट्रेनर), प्रमुख उपस्थितीमध्ये यू. डी. कांबळे, यु.के. डाढाळे, ए. व्ही. चाफाकानडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. प्रास्ताविकात एम. पी. महिपाल यांनी कार्यक्रमाची रूपरेखा सांगितली.

पुढे बोलताना डॉ. लोहाना यांनी महिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गोल्ड सेविंग बद्दल माहिती दिली. त्यामध्ये डिजिटल गोल्ड सेविंगचा पर्याय सांगितल्यानंतर सर्व महिला खूप आनंदित झाल्या. यावेळी उपस्थित महिलांच्या शंकांचे निरसनही डॉ. लोहाना यांनी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप रोडे यांनी केला. सूत्रसंचालन बुलबुले यांनी तर उपस्थितांचे आभार पुष्पा कदम यांनी मानले. यशस्वीतेसाठी सावित्री मंच सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR