दुष्काळात झेंडूच्या फुलांचा सुगंध झाला स्वस्त

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हयात अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतक-यांनी झेंडूच्या फुलांची लागवड केली होती. दसरा अर्थात विजया दशमीच्या पूर्व संध्येला शेतक-यांनी झेंडूच्या फूलांची तोंडणी करून लातूरच्या बाजार पेठेत विक्रीसाठी आणली आहेत. चार दिवसापूर्वी २० रूपये पाव किलो विकणारी झेंडूची फुले सोमवारी ४० ते ५० रूपये किलो दराने विक्री होताना दिसून आली. या फूलांच्या विक्रीतून शेतक-यांचा खर्चही निघने कठीण झाला असून एैन दुष्काळी परिस्थितीत शेतक-यांच्या झेंडूच्या फुलांचा सुगंध स्वस्त झाला आहे.
नवरात्र महोत्सवा निमित्त गेल्या नऊ दिवसामध्ये भाविक भक्तांनीनी अंबाबाईचा जागर केला आहे. मंगळवारी दसरा असल्याने नागरीक मोठया प्रमाणात खरेदीकडे वळाले आहेत. लातूरच्या बाजार पेठेत आजू बाजूच्या तालुक्यातून व विषेत: नांदेड जिल्हयातून मोठया प्रमाणात झेंडूची फुले विक्रीसाठी शेतकरी आले आहेत. त्यामुळे लातूरच्या बाजार पेठेत नांदेडच्या झेंडूच्या फूलांचा सुगंध दरवळत आहे. गेल्या चार दिवसापूर्वी २० रूपये पाव किलो झेंडूच्या फूलांची विक्री होत होती. सोमवारी विजया दशमीच्या पूर्व संध्येला झेंडूच्या फूलांच्या दरात घसरण होऊन ४० ते ५० रूपये किलो दराने झेंडूच्या फूलांची विक्री होत होती. दुष्काळात झेंडूच्या फुलांचा सुगंध स्वस्त झाला आहे.
लातूरच्या बाजारात  नांदेडचा ‘झेंडू’
नवरात्र उत्सवाची सांगता आज विजया दशमीने होणार आहे. नांदेड जिल्हयातून मोठया प्रमाणात झेंडूची फुले लातूर शहरात विक्रीसाठी आली आहेत. लातूर-बार्शी रस्त्यावरील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर झेंडूच्या फूलांची मोठया प्रमाणात विक्री होत असून नागरीकही मोठया प्रमाणात फूलांची खरेदी करातना दिसून येत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|नांदेडच्या बोरगावातील ४६ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
03:38
Video thumbnail
Latur|लातूर महापालिकेचा मोठा निर्णय! कर भरला नाही तर थेट मालमत्तेचा लिलाव!
01:40
Video thumbnail
Latur Water Theft News|लातूर मांजरा जलवाहिनीवर मोठी कारवाई! ३४ अनधिकृत कनेक्शन तोडले
02:09
Video thumbnail
Latur News|लातूरमध्ये दांडिया रासमधून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत
01:53
Video thumbnail
Latur Crime News|लातूरमध्ये तरुणाला नग्न करून मारहाण! पेट्रोल टाकल्याचा आरोप; चौघांविरुद्ध गुन्हा
02:52
Video thumbnail
कैमेऱ्यात कैद झालेला सर्वात भीषण जीवघेणा हल्ला! टायगर श्रॉफ थोडक्यात वाचला; थरारक व्हिडिओ समोर
00:31
Video thumbnail
रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ घालताय? पोलिसांचा बडगा बसणार! #breakingnews #digitalekmat #marathinews
01:05
Video thumbnail
Nilanga Congress Protest | शेतकरी मदत आणि SIR वरून काँग्रेस आक्रमक | Latur News | Ekmat Digital
06:45
Video thumbnail
Latur News | दुष्काळामुळे डाळ-तांदूळ महागले? ३०% दरवाढीचा दावा | Inflation News | Ekmat Digital
02:18
Video thumbnail
देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला; अपघातात पाच जणाचा मृत्यू #breakingnews #digitalekmat
00:57
Video thumbnail
CRPF Jawans Dandiya Celebration | सीआरपीएफ जवानांचा दांडिया | Navratri Special | Ekmat Digital
01:35
Video thumbnail
Daffi Marathi Movie Poster Launch|विशाल गिरींच्या ‘डफी’ची पहिली झलक! कलाकारांच्या हस्ते पोस्टर लॉन्च
03:16
Video thumbnail
Arvind Patil Nilangekar|३३.५३ कोटींचं कर्ज प्रकरण; निलंगेकरांची याचिका खंडपीठाकडून फेटाळली
02:43
Video thumbnail
Latur Illegal Moneylending Case | अवैध सावकारीविरोधात गुन्हा दाखल | Latur News | Ekmat Digital
01:52
Video thumbnail
Latur Railway Coach Factory | स्थानिक युवकांना रोजगार कधी? | Latur News | Ekmat Digital
03:12

Latest news