Homeलातूरनूतन जिल्हाधिका-यांची जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांनी घेतली सदिच्छा भेट

नूतन जिल्हाधिका-यांची जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख यांनी घेतली सदिच्छा भेट

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी आपल्या सहका-यांसह लातूरचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विकासाच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या चर्चेत जिल्ह्यातील बराजेसचे जुने झालेले गेट दुरुस्ती करणे, शेतक-यांना पिकविमा तत्परतेने मिळणे, पिण्याच्या पाण्याची वितरण व्यवस्था अधिक सक्षम करणे तसेच तुती लागवडीसंदर्भातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी विषयांवर सकारात्मक संवाद झाला. विशेषत: शेतकरी हिताच्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक शेतक-यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी कशी करता येईल, यावरही सखोल चर्चा करण्यात आली.
डॉ. भारत बास्टेवाड हे अनुभवी व कर्तव्यदक्ष अधिकारी असून, त्यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केला. यावेळी चर्चेदरम्यान लोकनेते विलासराव देशमुख यांनी लातूर जिल्ह्यात उभारलेल्या बंधा-यांच्या निर्मितीची आठवणही काढण्यात आली. त्या बंधा-यांच्या उभारणीत संबंधित विभागाचे अधिकारी म्हणून डॉ. बास्टेवाड यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाचा उल्लेख करण्यात आला. लातूर जिल्हाधिकारी म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणा-या उपक्रमांना आपले संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही धिरज विलासराव देशमुख यांनी यावेळी दिली.
या भेटीदरम्यान काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे, शहराध्यक्ष किरण जाधव, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संतोष देशमुख, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकूर (देशमुख), जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, रेणापूर काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रमोद कापसे, लातूर काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश बेद्रे, जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई भिसे, लातूर पंचायत समिती सभापती श्रीकांत बैले, उपसभापती महेश चव्हाण, रेणापुर शहर अध्यक्ष नितीन माटेगावकर, रेणाचे व्हाईस  चेअरमन प्रविण पाटील, रेणापूर बाजार समिती सभापती उमाकांत खलंग्रे, रेणापूर बाजार समिती उपसभापती शेषराव हाके पाटील, संचालक प्रकाश सुर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय टेकाळे, गंगासिंह कदम, जिल्हा परिषद  सदस्य भागीरथी पाटील, पंचायत समिती सदस्य दिपाली आदमाने, नगरसेवक सचिन मोटेगावकर, पंचायत समिती सदस्य गुरुनाथ गवळी किसान सेलचे अध्यक्ष रामानंद जाधव, जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत माने, दत्ता शिंदे, रेणापुर पंचायत समिती सदस्य प्रविण माने, सरपंच सुहास कदम, पप्पू देशमुख, नाना जाधव, मनोज कदम आदींची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR