Homeधाराशिवधाराशिवमध्ये पवनचक्कीच्या वाहनाने २ जणांना चिरडले; संतप्त जमावाने वाहन पेटवले

धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या वाहनाने २ जणांना चिरडले; संतप्त जमावाने वाहन पेटवले

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या वाहनाने दोन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना सोमवार, २९ डिसेंबर रोजी रात्री उशिरा घडल्याने एकच खळबळ उडाली. अपघातानंतर संतप्त जमावाने त्या वाहनाला पेटवून दिले. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाईस सुरुवात केली.

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथे पवनचक्कीच्या वाहनाने दोन जणांना चिरडल्याची घटना घडली. चांद शेख आणि वसंत जगताप यांचा पवनचक्कीच्या वाहनाच्या धडकेत जागेवरच मृत्यू झाला. हे वाहन पवनचक्कीसाठी खडी आणि वाळू याचे मिश्रण वाहून नेत असताना ही धडक झाली. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला अन् संतप्त जमावाने ते वाहन पेटवले. त्यानंतर जमावाकडून चालकालाही बेदम मारहाण करण्यात आली.

चांद शेख आणि वसंत जगताप अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
या भागातून अवजड वाहनांची वाहतूक करण्यास नागरिकांनी यापूर्वी विरोध केला होता, त्यानंतरही वाहतूक सुरू होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR