38.5 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeधाराशिव३० एप्रिलला मोदींची धाराशिवमध्ये सभा

३० एप्रिलला मोदींची धाराशिवमध्ये सभा

सहा तास धाराशिव-तुळजापूर महामार्ग राहणार बंद!

धाराशिव : महायुतीच्या उमेदवारांचा विजय व्हावा यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. केंद्रातील बडे नेते महाराष्ट्रात सभा घेत आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ( या सर्वोच्च नेत्यांचा समावेश आहे. दरम्यान, येत्या ३० एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांची धाराशीवला सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर धाराशिव-तुळजापूर महामार्ग सहा तास राहणार बंद राहणार आहे. या महामार्गावरून जाणा-या वाहनांना पर्यायी रस्त्यांनी जाण्याची सोय करण्यात आली आहे.

धराशीवमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या नेत्या अर्चना पाटील निवडणुकीच्या मैदानत आहेत. त्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत. याच कारणामुळे त्या राष्ट्रवादीच्या नेत्या असल्या तरी त्यांच्या विजयासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपाचे नेते पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या भगात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. येत्या ३० एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता धाराशिव-तुळजापुर रस्त्यावरील तेरणा महाविद्यालयाच्या शेजारील मैदानावर ही जाहीर सभा होणार आहे. याच कारणामुळे सभेच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवेतील वाहनांना परवानगी
सभेच्या दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग ५२ धाराशिव-तुळजापूर हा महामार्ग सर्व वाहनांना वाहतुकीसाठी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत बंद असणार आहे. या काळात पोलीस, रुग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने तसेच अत्यावश्यक सेवेतील इतर वाहनांना या मार्गावरुन जाण्यास परवानगी आहे. तशी माहिती माहिती जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

धाराशीवमध्ये निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील
दरम्यान, या वर्षी धाराशीवची निवडणूक चांगलीच चुरशीची ठरणार आहे. कारण या जागेवर अर्चना पाटील यांच्याविरोधात विद्यमान खासदार ओमराजे निंबाळाकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते असून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीत माझा विजय होणार, असा दावा त्यांच्याकडून केला जातोय. ते धाराशीवचे विद्यमान खासदार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR