36.4 C
Latur
Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाकेकेआरविरुद्ध पंजाबचा विक्रमी विजय

केकेआरविरुद्ध पंजाबचा विक्रमी विजय

कोलकाता : केकेआरने २६१ धावा केल्यावर तेच हा सामना सहज जिंकतील, असे वाटले होते. पण जॉनी बेअरस्टोच्या तुफानी शतकाच्या जोरावर पंजाबने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय साकारला. या सामन्यात ४२ षटकार, ३७ चौकार, ४० षटकांत ५२३ धावांचा पाऊस पाडला. या अगोदर राजस्थान रॉयल्सने २२४ धावांचा पाठलाग करताना विजय साकारला होता. पण त्यांचा हा विक्रम पंजाबच्या संघाने मोडीत काढला. केकेआरने पंजाबपुढे विजयासाठी २६२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा दमदार पाठलाग करत पंजाबच्या संघाने ८ विकेट्स राखत विजय मिळवला आणि आयपीएलमध्ये इतिहास रचला. जॉनी यावेळी पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने ४८ चेंडूंत नाबाद १०८ धावांची तुफानी खेळी साकारली, यामध्ये ८ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता. जॉनीला यावेळी शशांक सिंग आणि प्रभसिमरन सिंग यांनी अर्धशतके झळकावत सुयोग्य साथ दिली.

पंजाबच्या संघाचा एवढा आक्रमक पवित्रा हा पहिल्यांदाच या आयपीएलमध्ये पाहायला मिळाला. केकेआरने २६२ धावांचे आव्हान पंजाबपुढे ठेवले होते. पण पंजाबला यावेळी जॉनी बेअरस्टो आणि प्रभसिमरन सिंग यांनी धडाकेबाज सुरुवात करून दिली. पंजाबच्या संघाने यावेळी फक्त ३.३ चेंडूंतच अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे पंजाबला फक्त २१ चेंडूंत अर्धशतकी सलामी मिळाली. यावेळी प्रभसिरन सिंग हा भन्नाट फॉर्मात होता. कारण त्याने फक्त १८ चेंडूंत आपले अर्धशतक झळकावले आणि संघाला झोकात सुरुवात करून दिली. त्याने २० चेंडूंत ४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ५४ धावांची खेळी साकारत आपली जबाबदारी चोख पार पडली. त्यानंतर बेअरेस्टोने जोरदार फटकेबाजी करीत विजयात मोलाची कामगिरी बजावली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR