33.1 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रबस दरीत कोसळली; २५ जण जखमी

बस दरीत कोसळली; २५ जण जखमी

जळगाव : इंदूर शहराकडून अकोल्याकडे येणा-या खाजगी प्रवाशी बसचा शनिवारी अपघात झाला आहे. बसमधील प्रवाशी झोपेत असताना सकाळी पाच वाजता बस दरीत कोसळली. जळगाव जामोद – बु-हाणपूर मार्गावरील करोली घाटात हा बस अपघात झाला. झोपेत असलेल्या प्रवाशांना काय झाले हे कळण्याच्या आतच बस १०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात २० ते २५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर दर्यापूर (मध्यप्रदेश ) तसेच बु-हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, इंदूरवरुन अकोल्याकडे जाणारी ही बस रस्त्यात नादुरुस्त झाली. गाडी दुरुस्त करण्यासाठी चालक खाली उतरला. त्या ठिकाणी उतार असल्यामुळे चालकाने टायरच्या खाली लाकडाचा अडथळा लावला होता. परंतु बसच्या टायर खाली लावलेला हा अडथळा सरकला अन् बस उतारामुळे खाली दरीत कोसळली. या अपघातानंतर जखमींच्या मदतीसाठी आणि बसला दरीतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक लोकांनी मदत कार्य सुरु केले.

अपघातामधील जखमींना मदत कार्य सुरु करण्यासाठी घटनास्थळी नऊ रुग्णावाहिका दाखल झाल्या आहेत. अपघातात प्रवाशांच्या हात, पायांना गंभीर दुखापती झाल्या आहेत. बसमध्ये ४० ते ४५ प्रवाशी होते. ही बस रॉयल ट्रॅव्हल्सची होती. शाहापूर पोलीस ठाणे अंतर्गत हा बस अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणाचा मृत्यू झाला नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR