36.3 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रसांगलीत कोण बाजी मारणार ?

सांगलीत कोण बाजी मारणार ?

तीन पाटलांचा प्रचाराचा धडाका

सांगली : सांगली लोकसभा मतदार संघातील तीन प्रमुख उमेदवारांनी आज सांगली शहर आणि विधानसभा मतदार संघात आज एकाच दिवशी प्रचाराचा धडाका लावला. पहाटेपासून ते मतदारांशी संवाद साधायला बाहेर पडले. शिवसेनेचे चंद्रहार पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांनी पहाटे व्यायाम करणा-यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत व्यायाम केला. संजय पाटील यांनी शहरासह ग्रामीण भागात बैठका घेत आरोपांच्या फैरी झाडल्या. या निवडणुकीत सांगलीत विधानसभा मतदार संघाचा मूड निर्णायक ठरण्याची चिन्हे असल्याने तीन प्रमुख उमेदवारांचे या शहरावर विशेष लक्ष आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज मॉर्निंग वॉकर्ससह व्यायाम करणा-या तरुणाईची भेट घेतली. स्वत: मैदानात उतरत या पैलवानाने व्यायामही केला. यावेळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या ज्येष्ठांशीही त्यांनी संवाद साधला.

चंद्रहार पाटील यांनी आज सकाळी शहरातील आमराई उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम आणि महावीर उद्यान परिसरातील ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, हास्य क्लबचे सदस्य आणि व्यावसायिक यांची भेट घेतली. महाविकास आघाडीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. खेळाडूंसमवेत व्यायामही त्यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR