सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांच्या निकाल रविवारी २१ डिसेंबर रोजी जाहीर झाला. निकरात भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही तरीही सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप पुढे आला आहे.
जिल्ह्यात भाजपला अक्कलकोट, मैंदर्गी, बार्शी व अनगर या चार ठिकाणी आपले नगराध्यक्ष निवडून आणता आले.शिवसेना शिंदे गटाने सांगोला, दुधनी व मोहोळ या तीन नगरपालिकांमध्ये आपला नगराध्यक्ष निवडून आणला. शिवसेना उभाठाला कुर्डूवाडी मध्ये आपला नगराध्यक्ष विजयी करता आला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा अकलूज मध्ये नगराध्यक्ष निवडून आला. पंढरपूर मंगळवेढा व करमाळा या तीन ठिकाणी स्थानिक विकास आघाड्यांना विजय मिळवता आला. राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेस ज्यांना एकाही नगरपालिकेवर आपला नगराध्यक्ष विजयी करता आला नाही.
पंढरपूर मध्ये प्रणिता भालके या स्थानिक तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील उमेदवार जिल्ह्यात सर्वाधिक जवळपास ११००० पेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या. मात्र या नगर परिषदेत ३६ पैकी भाजपचे २४नगरसेवक विजयी झाले. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे ११ व एक अपक्ष नगरसेवक विजयी झाला. मोहोळ मध्ये शिवसेना शिंदे कटाच्या सिद्धी वस्त्रे या फक्त १७० मतांनी नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या. मात्र २० पैकी ११ नगरसेवक भाजपचे व आठ नगरसेवक शिंदे गटाचे निवडून आले. करमाळ्यात सावंत गटाच्या मोहिनी सावंत या नगराध्यक्ष झाल्या. सावंतगडाच्या आठ जागा भाजपच्या सात जागा तर शिवसेना शिंदे गडाच्या पाच जागा निवडून आल्या.
सांगोल्यात माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी गड राखला. त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाली २४ पैकी १५ नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले. भाजपचे चार शेकापचे तीन व दीपक साळुंखे यांच्या गटाचा एक नगरसेवक निवडून आला. बार्शी मध्ये ३६ पैकी २२नगरसेवक भाजपचे निवडून आले. १४ नगरसेवक ठाकरे गटाचे निवडून आले. नगराध्यक्षपदी भाजपच्या तेजस्विनी कथले या विजयी झाल्या. मंगळवेढ्यात भाजप व तीर्थक्षेत्र विकास आघाडी यांना ९ जागा मिळाल्या. दोन जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निवडून आल्या. मात्र नगराध्यक्ष तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा निवडून आल्याने येथे महायुतीची बहुमत होऊनही गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे. येथे काका बबनराव अवताडे यांनी भाजपचे आमदार समाधान आवताडे यांना चित्पट केले आहे.
अक्कलकोटमध्ये भाजपचे मिलन कल्याण शेट्टी साडेसात हजारपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले. २५ नगरसेवकांपैकी भाजपचे २३ व शिंदे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले. दुधनीमध्ये म्हेत्रे गटाच्या ताकदीमुळे नगराध्यक्ष व सर्व चे सर्व २० नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले.
मैंदर्गीमध्ये इतिहास घडला
मैंदर्गी नगरपालिकेच्या इतिहासात ३५ वर्षांमध्ये स्थानिक गटांची आघाडी होत होती. तेथे कधीही भाजपचा एकही नगरसेवक निवडून आला नव्हता. मात्र यंदा भाजपच्या अंजली बाजारमट यांनी स्थानिक आघाडीच्या उमेदवाराचा २५०० मतांनी पराभव करत नगराध्यक्षपदावर बाजी मारली. २० नगरसेवकांपैकी भाजपचे १८ तर स्थानिक आघाडीचे फक्त दोन नगरसेवक विजयी झाले.

