Homeक्रीडाराजस्थानचा रॉयल विजय

राजस्थानचा रॉयल विजय

गुवाहाटी : वृत्तसंस्था
आयपीएलच्या तिस-या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने पाचवेळचा चॅम्पियन चेन्नई किंग्सचा धुव्वा उडवित नवा इतिहास रचला. नांद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर आणि रवींद्र जडेजाच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सला अवघ्या १२७ धावांवर रोखले. या धावसंख्येचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीचे दमदार अर्धशतक आणि सलामीवीर यशस्वी जैयस्वालसह कर्णधार रियान परागच्या फटकेबाजीमुळे अवघ्या १३ व्या षटकात विजय मिळविला.
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने आपले अर्धशतक १५ चेंडूंमध्ये पूर्ण केले. कर्णधार रियान पराग हा वैभव सूर्यवंशीच्या शानदार खेळीबद्दल बोलला. नाणेफेकीत आम्ही नशीबवान ठरलो. खेळपट्टी लाल मातीची होती आणि पाऊसही पडला. गोलंदाजांनी त्यांचे काम चोख बजावले. कर्णधारपदासाठी खूप तयारी केली आणि ट्रॉफी जिंकणे हे आमचे ध्येय आहे. रियानच्या विधानामुळे स्पष्ट समजत आहे की, राजस्थानच्या विजयामागे फक्त वैभव जबाबदार नाही तर गोलंदाज म्हणजे नांद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर, रवींद्र जडेजा, रवी बिश्नोई, ब्रिजेश शर्मा आणि संदीप शर्मा जबाबदार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR