40.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeक्रीडाराजस्थानचा रॉयल विजय

राजस्थानचा रॉयल विजय

जयपूर : राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा सहा विकेट्सनी पराभव करत आपला चौथा विजय साजरा केला. राजस्थान रॉयल्सने आरसीबीचे १८३ धावांचे आव्हान १९ षटकांत ४ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. बटलरने ५८ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली तर संजू सॅमसनने ६९ धावांची खेळी करत बटलरसोबत दुस-या विकेटसाठी १४८ धावांची भागीदारी रचली. या सामन्यात आरसीबीच्या विराट कोहलीचे शतक व्यर्थ गेले.

जॉस बटलरचे हे शंभराव्या सामन्यातील शतक खास ठरले. आयपीएलमध्ये १०० व्या सामन्यात शतकी खेळी करणारा तो केएल राहुलनंतरचा दुसराच खेळाडू ठरला. राजस्थान रॉयल्सने सलग चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. त्यांनी केकेआरला मागे खेचले तर आरसीबीने पराभवाचा चौकार मारला.
आयपीएलच्या १९ व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १८३ धावा ठोकल्या. विराट कोहलीने हंगामातील पहिले शतक ठोकत ७२ चेंडूत नाबाद ११३ धावांची खेळी केली. त्याला साथ देत कर्णधार फाफ ड्युप्लेसिसने ४४ धावा केल्या. या दोघांनी १२५ धावांची सलामी दिली. मात्र विराट कोहलीने दमदार शतक ठोकूनही आरसीबीला २०० धावांचा मार्क पार करता आला नाही. त्यांची गाडी पुन्हा १८३ धावांवर अडकली. त्यामुळे राजस्थान रॉयल्सने सहज विजय प्राप्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR