लातूर : प्रतिनिधी
लातूर येथील ४२ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटावूनचा ४३ वा पदग्रहण सोहळा रोटरी डिस्ट्रीक्टचे प्रांतपाल इलेक्ट क्षितीज झावरे व उपप्रांतपाल नागनाथ आगवाणे यांचे उपस्थितीत पार पडला. नुतन अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रमेश चिल्ले तर सचिव म्हणून उद्योजक उमेश पत्रावळे यांनी मावळते अध्यक्ष अमोल दाडगे व सचिव पवन मालपानी यांचेकडून पदभार स्वीकारला.
यावेळी रोटरी क्लब ऑफ सॅटॅलाइट अध्यक्ष सुप्रिया दाडगे व स्वाती बादाडे तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ मिडटावूनच्या अध्यक्ष तनिक्षा बोरा सचिव यश बांगर व शौनक सांगवीकर यांनी पदभार स्वीकारला. तसेच इंटरॅक्ट क्लबचे ही पदग्रहण झाले. येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात झालेल्या पदग्रहण सोहळ्यात रोटरीचे माजी प्रांतपाल विजय राठी मागील वर्षाचे प्रांतपाल सुधीर लातूरे, डॉ. सोपानराव जटाळ, अॅड. उदय गवारे, माधवराव पाटील टाकळीकर, शरद झरे, कवी नरसिंग इंगळे, समाजातील मान्यवर व रोटरियन कुटुंबीयसह मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरीष उटगे, शशिकांत मोरलावार, लितेश शहा, अजय दुडले, अनिल पाटील, विशाल आयाचित, वीरेंद्र पुंडीपल्ले, प्रशांत भाटगावे, जयप्रकाश सोनी, मोतीलाल वर्मा, श्रद्धानंद अपशेट्टी, रवींद्र बनकर, किशोर दाताळ, गिरीश पेन्सलवार, संगीता लातूरे यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. सूत्रसंचालन डॉ. राजगोपाल तापडिया व ओमप्रकाश झुरळे यांनी केले.
















