41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनरोहनप्रीत सिंग करणार टीव्हीवर पदार्पण

रोहनप्रीत सिंग करणार टीव्हीवर पदार्पण

मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर आणि पती रोहनप्रीत सिंग यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. रोहनप्रीत सिंग हर्ष लिंबाचियासोबत ‘सुपरस्टार सिंगर ३’ रिअ‍ॅलिटी सिंगिंग शो सह-होस्ट करणार आहे.

हर्ष लिंबाचिया याआधी हा शो एकटाच होस्ट करत होता. तर दुसरीकडे, रोहनप्रीत सिंगची पत्नी नेहा कक्कर या शोला जज करणार आहे. रोहन आणि नेहा हे रिअल लाईफ कपल पहिल्यांदाच एका शोमध्ये एकत्र दिसणार आहे.

दरम्यान, २०२० मध्ये बॉलिवूड गायिका नेहा कक्करसोबत लग्न केल्यानंतर रोहनप्रीत सिंग लोकप्रिय झाला, पण त्याच्यासमोर नवीन आव्हानेही आली. तो अनेकदा नेहा कक्करचा नवरा म्हणून ओळखला जायचा, पण आता रोहनप्रीत सिंग त्याच्या करिअरमध्ये नवी सुरुवात करणार आहे. आता रोहनप्रीत टीव्हीवर पदार्पण करणार आहे आणि पहिल्यांदाच अशी भूमिका साकारणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR