40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रपीएनजी सन्सला सीएफबीपीचा ‘जमनालाल बजाज’ पुरस्कार

पीएनजी सन्सला सीएफबीपीचा ‘जमनालाल बजाज’ पुरस्कार

महाराष्ट्रातील पहिला सराफी ब्रँड

पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील आघाडीचा सराफी ब्रँड असलेल्या व फॉर्च्युन ५०० इंडिया २०२१च्या यादीत समाविष्ट असलेल्या पीएनजी सन्सला (पु. ना. गाडगीळ आणि सन्स) कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिस (सीएफबीपी)चा ३६सावा जमनालाल बजाज फेअर बिझनेस प्रॅक्टिस पुरस्कार मिळाला आहे.

हा सन्मान मिळविणारा पीएनजी सन्स हा महाराष्ट्रातील पहिलाच सराफी ब्रँड ठरला आहे. मुंबईत झालेल्या सोहळ्यात पीएनजी सन्सचे संस्थापक – अध्यक्ष अजित गाडगीळ व कंपनीचे संचालक – सीईओ अमित मोडक यांनी हा पुरस्कार उद्योजक शेखर बजाज व ब्रीज कँडीचे डॉ. हेमंत ठाकर यांच्या हस्ते स्वीकारला.

पारदर्शी व्यापारवृद्धीसाठी जे. आर. डी. टाटा, रामकृष्ण बजाज यांच्यासह अन्य उद्योजक व व्यावसायिकांनी मिळून सीएफबीपीची स्थापना केली. ग्राहक सेवा-समाधान, सीएसआर, पर्यावरण, वित्त-लेखा, नियम, कर्मचारी यांच्यासह एकूण नऊ निकषांची तपासणी सीएफबीपीने केली. तसेच, त्यावरील सादरीकरण, मुलाखत आदींचा यात समावेश होता. देशभरातून विविध कंपन्यांनी सीएफबीपीच्या पुरस्कारासाठी नामांकन भरले होते. त्यात पीएनजी सन्सला मोठ्या कंपन्यांच्या श्रेणीत स्थान मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR