34.8 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनसुपरस्टार विजय सर्वात महागडा नायक

सुपरस्टार विजय सर्वात महागडा नायक

मुंबई : साऊथचा सुपरस्टार विजय सध्या त्याच्या ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ (जीओएटी) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या रशियामध्ये सुरू आहे. याशिवाय विजय आपली राजकीय इनिंगही सुरू करणार आहेत. नुकतीच त्यांनी एका राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. पण, त्याआधी तो आपला आणखी एक चित्रपट प्रेक्षकांना देणार आहे, ज्याचे नाव ‘दलपती ६९’ आहे. या अंतिम चित्रपटाच्या शूटिंगनंतर तो चित्रपट श्रृष्टीतून बाहेर पडणार आहे. सुत्रांच्या मते, विजयने दलपती ६९ या चित्रपटासाठी मोठी फिस घेतली आहे, त्यामुळे तो तमिळ चित्रपटातील सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे.

जेव्हापासून अभिनेता विजयने त्याच्या राजकीय पक्षाची घोषणा केली तेव्हापासून त्याच्या चाहत्यांना तो त्याच्या अंतिम चित्रपटाचे शूटिंग कसे पूर्ण करेल याची चिंता आहे. विजयबाबत विविध अंदाज बांधले जात आहेत. तथापि, विजय सध्या जीओएटी आणि त्याच्या अंतिम दलपती ६९ चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे.

दरम्यान, विजयच्या फीबाबत चित्रपट क्षेत्रात जोरात चर्चा सुरू आहे. विजयच्या अंतिम चित्रपटाबाबत अशी माहिती समोर आली आहे, जी तुम्हाला आश्चर्यचकित करेल. दलपती ६९ साठी विजय जवळपास २५० कोटी रुपये घेत असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट एच विनोद दिग्दर्शित करत आहेत. विजय हा तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता तर ठरला आहेच, पण त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर निवृत्त होणारा तो पहिला अभिनेताही ठरणार आहे.

विजयच्या पक्षाचे नाव काय?
तमिळ सुपरस्टार विजयने फेब्रुवारीमध्ये आपल्या राजकीय पक्षाच्या नावाची घोषणा केली होती. विजशने आपल्या पक्षाचे नाव ‘तमिलगा वेत्री काझम’ असे ठेवले आहे. विजयने लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचे नाव जाहीर केले असले तरी त्याचा पक्ष लोकसभा निवडणूकीत उतरणार नाही, विजयचा पक्ष विधानसभा लढवणार आहे. तत्पूर्वी विजयला आपले आगामी पोजेक्ट्स पूर्ण करायचे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR