38.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeलातूरसुरशरण स्मृती पुरस्कार तालमणी  डॉ. राम बोरगावकर यांना प्रदान

सुरशरण स्मृती पुरस्कार तालमणी  डॉ. राम बोरगावकर यांना प्रदान

लातूर : प्रतिनिधी
येथील मराठवाडा संगीत कला अकादमी व रिसर्च सेंटरचे अध्यक्ष सुप्रसिध्द तबलावादक तालमणी डॉ. राम बोरगावकर यांना पं. रघुनाथ तलेगावकर फाउंडेशन ट्रस्ट आणि संगीत कला केंद्र, आग्रा (पुणे) यांच्या वतीने ‘सुरशरण स्मृती सन्मान पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार दरवर्षी ज्येष्ठ संगीततज्ञाला दिला जातो. यावर्षीचा हा पुरस्कार ज्येष्ठ संगीतज्ञ डॉ. राम बोरगावकर यांच्या संगीत क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल तसेच संगीत क्षेत्रातील साधना, संगीत कलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेले कार्य, यासोबतच अखंड संगीत यज्ञाच्या माध्यमातून उदयोन्मुख कलावंतांना घडविणा-या डॉ. बोरगावकर यांना सुरशरण स्मृती सन्मान पुरस्कार केंद्राचे अध्यक्ष विजय पालसिंह चौहान, सचिव प्रतिभा केशव तलेगावकर, पं. डॉ. मनोज राव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व रोख रक्कम, असे या पुरस्काराचे स्वरुप होते. सुरशरण  सन्मान पुरस्कार सोहळा हा २० एप्रिल २०२४ रोजी पुणे येथे पार पडला.  त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल द्वारकादास शामकुमारचे  तुकाराम पाटील, अँड. दासराव शिरुरे, प्राचार्य बाबुराव जाधव, प्राचार्य निलेश राजेमाने, प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, प्रा. विश्वनाथ स्वामी यांचेसह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR