39.8 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeलातूरकृषी उत्पन्न बाजार समितीत डॉ. काळगे यांचे जंगी स्वागत 

कृषी उत्पन्न बाजार समितीत डॉ. काळगे यांचे जंगी स्वागत 

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी दि. २४ एप्रिल रोजी सायंकाळी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडते, खरेदीदार, व्यापारी, गुमास्ता, हमाल, मापाडी यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.  काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांंनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील गौरी-शंकर मंदीरात जाऊन आरती केली. त्यानंतर त्यांनी आडते, खरेदीदार, व्यापारी, गुमास्ता, हमाल, मापाडी यांची प्रत्येक्ष जाऊन सदिच्छा भेट घेतली.
त्यावेळी आडत बाजारातील सर्वच घटकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. डॉ. शिवाजी काळगे यांना आडते, खरेदीदार, व्यापारी, गुमास्ता हमाल, मापाडी, शेतकरी यांच्याकडून उत्स्फर्त प्र्रतिसाद मिळाला. फटाक्यांच्या आतषबाजीने व पुष्पहाराने डॉ. शिवाजी काळगे यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.  यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, संचालक सुधीर गोजमगुंडे, आडत असोशिएशनचे अध्यक्ष चंद्रकात पाटील, गुमास्ता मंडळाचे अध्यक्ष तुळसीराम गंभीरे, गुमास्ता  मंडळाचे उपाध्यक्ष संजय माने, ज्योतीराम कदम, भाऊराव लवटे, सुरेश धानुरे, दिनकर मोरे, चंद्रकांत सुर्यवंशी, अमर पवार, गुलाब मोहिते, सुरेश ढमाले, कालीदास खाडप शरद जगताप, सोनाळे, बंडु देशमुख, नेताजी जाधव, हर्षवर्धन सवई, शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR