37.3 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना (उबाठा) सोमवारी मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल करणार

शिवसेना (उबाठा) सोमवारी मुंबईत उमेदवारी अर्ज दाखल करणार

मुंबई : महाराष्ट्रात पहिल्या आणि दुस-या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर उर्वरित तिन्ही टप्प्यासाठी निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा सर्वत्र पहायला मिळत आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०- मुंबई दक्षिण मध्य’ आणि ‘३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही मतदारसंघांकरीता शुक्रवार २६ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध झाली असून दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी नामनिर्देशन पत्रे सादर करण्यास सुरुवात झाली आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाकरिता एकीकडे महायुतीच्या उमेदवारांचे नाव गुलदस्त्यात असताना ठाकरे गटाचे मुंबई दक्षिण मध्य तसेच मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघांकरिता अनुक्रमे अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे सोमवारी म्हणजेच २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. कुलाबा येथील रिगल सिनेमा चौकातील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात होईल. यावेळी आदित्य ठाकरे देखील सोबत असतील. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी नामांकन दाखल करते वेळी उपस्थित असतील मात्र सध्या तरी मोठ्या नेत्यांची नावे समजू शकलेली नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR