Homeमहाराष्ट्र१२ रुपये ३५ पैसे दराने केंद्राकडून कांदा खरेदी

१२ रुपये ३५ पैसे दराने केंद्राकडून कांदा खरेदी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
सातारा : प्रतिनिधी
राज्यात कांद्याचे दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतक-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज साता-यातील कार्यक्रमात केंद्र सरकारने महाराष्ट्रात आजपासून १२ रूपये ३५ पैसे दराने कांदा खरेदी सुरू केल्याचे जाहीर केले. यासोबतच थकीत शेतक-यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला अनुसरून राज्य सरकार पुढील ६ महिने कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आखाती देशातील युद्ध, निर्यात बंदी आणि निसर्गाच्या प्रकोपामुळे कांद्याचा खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आज प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतक-यांसह विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कांदा विकत घेण्याची विनंती केली. या विनंतीला मान देऊन आजपासून महाराष्ट्रात शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्त्वात १२ रुपये ३५ पैशांनी कांद्याची खरेदी सुरु होत आहे. हा शेतक-यांना मोठा दिलासा ठरेल, असे फडणवीस म्हणाले. सातारा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ््याच्या अनावरण कार्यक्रम सोहळ््यासाठी उपस्थिती लावली. यानंतर प्रधानमंत्री आवास योजनेच्या आणि घरकुल लोकार्पण सोहळ््याच्या कार्यक्रमातही ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.

आखाती देशातील तणाव
स्थितीमुळे मोठा फटका
केंद्र सरकारने कुठलीही निर्यात बंदी ठेवलेली नाही. मात्र, जगाचे संपूर्ण अर्थकारण एका होर्मुझवर थांबलेले आहे. आज मुंबई बंदरामध्ये किती शेतीमाल पडून आहे. आज कांद्याचे दर कोसळले हे चिंतेची बाब आहे, या संदर्भात सरकार नक्कीच विचार करेल. परंतु आज निर्यात बंदी नसतानाही आखाती देशात उद्भवलेल्या परिस्थितीला आपल्या सगळ््याना सामोरे जावे लागत आहे, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR