Homeक्रीडा१८ वर्षांच्या इतिहासात २३ हॅटट्रिक

१८ वर्षांच्या इतिहासात २३ हॅटट्रिक

आयपीएलच्या हंगामातील विक्रम

मुंबई : आयपीएलच्या १८ वर्षांच्या इतिहासात २३ हॅटट्रिक पाहायला मिळाल्या असून पहिल्या हॅटट्रिकसह सर्वाधिक तीन वेळा आणि एका हंगामात दोन हॅटट्रिकचा पराक्रम हा भारतीय गोलंदांनी करून दाखवला आहे. लक्ष्मीपती बालाजी हा आयपीएलच्या इतिहासात पहिली हॅटट्रिक नोंदवणारा गोलंदाज आहे. पहिल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाकडून खेळताना पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने इरफान पठाण, पीयूष चावला आणि विक्रम राजवीर सिंग यांच्या रुपात हॅट्ट्रिकचा डाव साधला होता.

आयपीएलच्या गत हंगामात आयपीएलच्या इतिहासातील शेवटची हॅटट्रिकची नोंद देखील पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई किंग्स यांच्यातील सामन्यात नोंदवली गेली. यावेळी पंजाबच्या संघाकडून युझवेंद्र चहलनं चेन्नईच्या संघातील दीपक हुड्डा, अंशुल कंबोज आणि नूर अहमद यांची शिकार करत हॅटट्रिक पूर्ण केली होती. याआधी २०२२ मध्ये राजस्थानकडून खेळताना युझीने कोलकाता विरुद्ध हॅटट्रिकचा डाव साधल्याचा रेकॉर्ड आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅटट्रिकचा रेकॉर्ड हा देखील एका भारतीय गोलंदाजाच्या नावे आहे. फिरकीपटू अमित मिश्रा याने २००८ च्या पहिल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना डेक्कन चार्जर्सविरुद्ध पहिली हॅटट्रिक नोंदवली होती.

त्यानंतर त्याने डेक्कन चार्जर्सकडून पंजाबविरुद्ध (२०११) आणि सनरायझर्स हैदाबादकडून पुणे वॉरियर्स विरुद्ध हॅटट्रिकचा पराक्रम नोंदवला. भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने पंजाब किंग्सकडून खेळताना २००९ च्या एकाच हंगामात दोन हॅटट्रिकचा खास विक्रम नोंदवला होता. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि डेक्कन चार्जर्सविरुद्ध ही अविश्वसनीय कामगिरी करून दाखवली होती. उत्तुंग फटकेबाजीसह फलंदाजीत हिटमॅन नावाने ओळखल्या जाणा-या रोहित शर्माच्या नावेही एका हॅटट्रिकची नोंद आहे. २००९ च्या हंगामात डेक्कन चार्जर्सच्या ताफ्यातून खेळताना त्याने मुंबई इंडियन्सविरुद्धच हा डाव साधला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR