नांदेड : प्रतिनिधी
नीट यूजी २०२६ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे नांदेड जिल्ह्यातून नीट परीक्षा दिलेल्या हजारो विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. तर अभ्यास आणि मेहणत करूनही आमचा यात दोष काय, असा सवालही उपस्थित केला आहे.
राष्ट्रीय परीक्षा एजन्सी नवी दिल्ली मार्फत आयोजित ‘नीट (युजी)- २०२६’ प्रवेश परीक्षा ३ मे रोजी जिल्ह्यातील ४६ केंद्रावर घेण्यात आली होती. यात शहरातील २४ तर ग्रामीण भागात २२ परीक्षा केंद्रांचा समावेश होता. अंत्यत कडक नियमावली आणि वैद्यकीय तपासणीअंती ही परीक्षा पार पडली.
नांदेड जिल्ह्यातील ४६ केंद्रावर १५ हजार ८४० परीक्षार्थ्यांपैकी १५ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र पेपर फुटीमुळे परीक्षा रद्द झाल्याने या विद्यार्थ्यांना मानसिक धक्का बसला आहे.

