Homeलातूरकृषिदूत व कृषिकन्यांनी शेतक-यांसाठी कमी खर्चिक उपाययोजना सूचवाव्यात

कृषिदूत व कृषिकन्यांनी शेतक-यांसाठी कमी खर्चिक उपाययोजना सूचवाव्यात

लातूर : प्रतिनिधी
कृषिदुत व कृषिकन्यांनी शेतक-यांच्या समस्यांवर कमी खर्चाच्या व पर्यावरण पुरक उपाययोजना सूचवावाात, असे आवाहन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले.
कृषि महाविद्यालयात सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम आणि ग्रामीण उद्योजगता जागरुकता व विकास योजना अभिमुखता कार्यक्रम तसेच व्यक्तीमत्व विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कृषि महाविद्यालयातील एकूण १२५ विद्यार्थी कृषिदुत व कृषिकन्या म्हणुन नियुक्त केले आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे होते तर व्यक्तीमत्व विकास व संवाद कौशल्यवृध्दी प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रशिक्षक म्हणून सनएज मार्केटींग प्रायव्हेट लिमीटेडचे संस्थापक व संचालक डॉ. छगन राठोड आणि अंबाजोगाई येथील आयई प्रो केंद्राचे डॉ. नागेश जोंधळे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की कृषिदुत व कृषिकन्या यांनी ग्रामीण जीवनाशी समरुप  होत शेतक-यांच्या समस्या जाणून घ्याव्यात तसेच त्यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच शेतक-यांच्या अनुभवातून समृध्द झालेले ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.  मंचावर डॉ. व्यंकट जगताप,  संदीप अंबेसंगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. प्रभाकर आडसूळ, डॉ. अनिलकुमार कांबळे, डॉ. नितीन तांबोळी, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर, डॉ. वैभव कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे यांनी केले तर आभार डॉ. अनंत शिंदे यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR