नांदेड : प्रतिनिधी
जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत लिंबगाव पोलिसांनी सुगाव शिवारात सुरू असलेल्या अंदर-बाहेर जुगार अड्ड्यावर धाड टाकून ७ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, ४ मोबाईल, ३ दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख १२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध धंद्यांविरोधात सध्या विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान लिंबगाव पोलिसांना सुगाव शिवारातील स्वामी समर्थ मंगल कार्यालयाजवळील शेतात झाडाखाली जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अंदर-बाहेर नावाचा जुगार खेळणा-या ७ जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईदरम्यान आरोपींकडून ९ हजार २०० रुपये रोख, ४ मोबाईल (२३ हजार रुपये), ३ दुचाकी (१ लाख ८० हजार रुपये) तसेच जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. एकूण २ लाख १२ हजार २०० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी फिरोज खान रहीम खान, शेख अमीर शेख अहमद, इम्रान खान आयुब खान, शेख महेबुबोद्दीन शेख अमिरोद्दीन, शेख कलीम शेख सलीम, शेख अफनान शेख इब्राहिम आणि बाजमेर खान गुलमेर खान या ७ आरोपींविरुद्ध लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
















