वांगचुक यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

वांगचुक यांना रुग्णालयात हलविले, जंतरमंतरवर पोलिस बळाचा वापर, आंदोलक आक्रमक
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राजधानी दिल्लीत जंतरमंतरच्या मैदानावर गेल्या २१ दिवसांपासून पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असताना शनिवारी सकाळी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून बेमुदत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, असा दावा कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केला. सध्या वांगचूक यांच्यावर उपचार सुरू आहेत. परंतु त्यांनी अन्न खाण्यास विरोध केला असून माझे हे आंदोलन सुरूच राहील, अशी ठाम भूमिका घेतली. केंद्राच्या या दडपशाहीला देशभरातून विरोध होत असून, कॉकरोच जनता पार्टीसह विविध पक्ष संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे देशभरात आंदोलन पेटण्याची चिन्हे आहेत.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू होते. परंतु वांगचुक यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू होते. त्यांची प्रकृती खालावली होती. याचे निमित्त करून केंद्र सरकारने सुरक्षा बळाचा वापर करून सकाळी वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. वांगचुक यांना उचलून नेताना आंदोलकांनी विरोध केला. त्यावेळी आंदोलकांना मारहाण, धक्काबुक्की करून वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेण्यात आले. या आंदोलनाची चर्चा आता देशभरात होत आहे.

या आंदोलनाला विविध पक्षांचे राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, अनेक सिने अभिनेते, अभिनेत्रींनी वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तसेच विरोधी पक्षांनीही आंदोलन चिरडण्याच्या प्रकाराचा निषेध केला. दरम्यान, पोलिसांच्या कारवाईमुळे जंतरमंतरवर काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हा लढा आता आणखी तीव्र होईल, असा इशारा सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिला. आता आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राजीनामा हवा आहे, अशी मोठी मागणी त्यांनी केली.

गेल्या २८ जूनपासून सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटीच्या विरोधात उपोषणाला बसले होते. त्यांच्यासोबत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके आंदोलनात सहभागी होते. या २१ दिवसांच्या उपोषणात वांगचुक यांचे तब्बल ९ किलो वजन घटले असून, अंतर्गत अवयवांना गंभीर इजा होण्याचा धोका डॉक्टरांनी वर्तवला होता. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी शनिवारी पहाटे वांगचुक यांना वैद्यकीय देखरेखीखाली रुग्णालयात हलवले. या कारवाईदरम्यान आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला आणि पोलिसांनी अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतले. त्यातच २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा धडकणार आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

उपचारास नकार
सोनम वांगचुक डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता आहे. तसेच चयापचय विकारांची लक्षणे दिसत आहेत. त्यांना आज बळजबरीने रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांनी रुग्णालयात औषधे आणि सलाईन घेण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.

दिपके यांच्यावर शाईफेक
कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी केंद्राच्या आंदोलन चिरडण्याच्या प्रयत्नावर आक्रमक भूमिका घेतली असून, सकाळी भाषण करताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणा-या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या आंदोलनात पुढे काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दिपकेंचे आमरण उपोषण
वांगचुक यांना आंदोलनस्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. यावेळी ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी स्वत: आमरण उपोषण सुरू केले. आता २० जुलै रोजी मोर्चाही पूर्वनियोजनाप्रमाणे काढण्यात येणार आहे. वांगचुक यांना हटवून हे आंदोलन संपेल, असा सरकारचा समज असेल तर तो चुकीचा आहे. आंदोलन आणखी तीव्र होईल, असा इशारा त्यांनी दिला.

पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी
दिपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारने अंत पाहू नये : अण्णा
आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. जनलोकपाल विधेयक लागू करण्यासाठी तसेच देशातील भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा, यासाठी अण्णा हजारे यांनी २०११ साली मोठे आंदोलन उभे केले होते. आता त्यांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सरकारने वांगचुक यांचा अंत पाहू नये, असे परखड मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

कोर्टाच्या आदेशाचे पालन : पोलिस
२० दिवसांपासून उपोषणावर असलेल्या ५९ वर्षीय वांगचुक यांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन करून आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
उजनीतून सोडलेले पाणी सीना नदीत; लाखो एकर शेतीला मिळणार संजीवनी
00:58
Video thumbnail
पालईगुडा–कुपटी राज्य मार्गावरील पूलांचे काम रखडले; मुसळधार पावसात मार्ग बंद पडण्याची भीती
00:23
Video thumbnail
Nanded|दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात; चिखलीकरांची स्पष्ट भूमिका
01:37
Video thumbnail
Latur Murder|खून झाला... तरी बारवर कारवाई नाही? नेमकं संरक्षण कुणाचं?
02:38
Video thumbnail
Big Breaking : नीट पेपरफुटी प्रकरणात CBI पुन्हा लातुरात; तपासाला वेग!
03:15
Video thumbnail
Latur|पावसासाठी वडवळ नागनाथमध्ये शेकडोंचे नवनाथ पारायण
05:12
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाअभावी खरीप हंगाम संकटात
02:56
Video thumbnail
Latur|रेणापूरमधील बेकरीवर FDA चा छापा; परवाना जागेवरच रद्द
00:56
Video thumbnail
Solapur|धक्कादायक! सोलापूरच्या जलवाहिनीला तडा; लाखो लिटर पाणी वाया
01:04
Video thumbnail
Latur|जन्मभूमीतून खासदारांचा जनता दरबार; नागरिकांच्या समस्या थेट ऐकल्या
04:18
Video thumbnail
Nanded|"दोन-चार अधिकाऱ्यांना सस्पेंड करा!" – अशोक चव्हाण संतापले
04:36
Video thumbnail
Latur|पदवी आणि UPSC-MPSC तयारी आता एकाचवेळी!;MIT चा अभिनव उपक्रम
02:07
Video thumbnail
Latur|खानापूर रस्त्यावर आशाताई भिसे आक्रमक; अधिकाऱ्यांना उतरावं लागलं मैदानात
04:49
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
17:00
Video thumbnail
LIVE- शक्तीपीठ महामार्गाविरोधात पंढरपुरात आंदोलन; आमदार अमित देशमुखांची उपस्थिती
00:00

Latest news