महामार्गावरील धोकादायक वळणांच्या सुधारणेस मंजुरी

चाकूर : प्रतिनिधी
आष्टामोड ते उदगीर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरील नळेगावजवळील तसेच टोल नाका परिसरातील धोकादायक वळणांच्या सुधारणेच्या कामाला मंजुरी मिळाली असून, या कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या दोन्ही ठिकाणी असलेल्या तीव्र वळणांमुळे गेल्या अनेक वर्षांत मोठ्या प्रमाणात अपघात झाले असून, अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या अपघातप्रवण ठिकाणांची तातडीने सुधारणा करण्याची मागणी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याची दखल घेत या कामाला मंजुरी देण्यात आली असून, पुढील कार्यवाहीसाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. डीपीआर पूर्ण झाल्यानंतर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष सुधारणा कामाला गती मिळणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मन:पूर्वक आभार मानले आहेत. तसेच या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे अमोल पाटील कौळखेकर यांचेही त्यांनी विशेष आभार व्यक्त केले. या सुधारणेमुळे आष्टामोड-उदगीर मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असून, अपघातांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur -गवळी समाजाची 15 वर्षांची परंपरा कायम; आषाढ महोत्सवात भक्तांची गर्दी
03:25
Video thumbnail
Purna|आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम
02:40
Video thumbnail
Latur|वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी संभाजी सेनेचे आंदोलन
03:44
Video thumbnail
Nanded|: 'गुंगी गुडिया' वक्तव्यावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांविरोधात जोडे मारो आंदोलन
03:29
Video thumbnail
Latur|जळकोट तालुक्यात जलस्रोत तुडुंब; पाण्याचा प्रश्न मिटला, शिवार हिरवाईने नटले
01:14
Video thumbnail
Solapur| मोहोळमध्ये संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
01:19
Video thumbnail
Latur|नांदेड–बिदर महामार्गावरील सिमेंट रस्त्याला मोठ्या भेगा; अपघाताचा धोका
00:59
Video thumbnail
Latur|शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भव्य स्मारकाची तयारी; चार दिवसांत मोठा निर्णय!
03:22
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29

Latest news