38.4 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रदुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी परत मिळणार

मुंबई : राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची परिपूर्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य मंडळातर्फे विद्यार्थ्यांचा आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्याची माहिती ऑनलाईन मागविण्यात येत आहे. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना ही माहिती भरण्यासाठी (दि. २८) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त आणि टंचाईग्रस्त भागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती राज्य मंडळस्तरावरून करण्यात येणार आहे. शासनाने जाहीर केलेले ४० तालुके व १ हजार २१ महसूल विभागातील बाधित क्षेत्रातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.
या क्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ साठी बसलेल्या नियमित विद्यार्थ्यांची यादी दहावीसाठी https://feerefund.mh-ssc.ac.in Afd¯f https://feerefund.mh-hsc.ac.in या लिंकवर उपलब्ध करून दिली आहे.

ऑनलाईन माहिती भरण्यास येणारी तांत्रिक अडचण लक्षात घेता २८ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती मिळण्यासाठी संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा. या संदर्भात राज्य मंडळाच्या https://mahahsscboard.in/  संकेतस्थळावर माहिती दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR