39.2 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeसोलापूरसोलापूरचे प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा : निखिल मोरे

सोलापूरचे प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा : निखिल मोरे

सोलापूर : आधीच प्रदूषित असलेल्या सोलापूरमध्ये हिवाळ्यात प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये दिवाळीचे फटाके व इतर अनेक घटकांमुळे येथे प्रदूषण पुन्हा वाढले होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार, सोलापूरच्या हवेची गुणवत्ता समाधानकारक ते मध्यम स्तरावर आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपाय योजना लवकरच करण्यात येणार आहेत. सोलापूरचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी कृतीयुक्त आराखडा राबविण्यात येणार आहे.

सुधारण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने राष्ट्रीय स्वच्छ व शुद्ध हवा कार्यक्रमाची योजना सोलापुरात राबविण्यात येणार आहे. यासाठी विविध संस्थांनी एकत्र येऊन कृती आराखडा तयार केला आहे. त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. लवकरच मनपाच्या वतीने योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मोरे यांनी दिली आहे.

सोलापूर शहरात महानगरपालिका, सात रस्ता येथील नियोजन भवन, जुळे सोलापूर या तीन ठिकाणी वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्र आहेत. येथील आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्याच्या एकूण ३० दिवसापैंकी सोलापूरच्या एका विभागात ३० दिवस तर इतर दोन ठिकाणी २९ दिवस हवा प्रदूषित होती. ह्यात प्रदूषकामध्ये सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण जादा आहे. हे आरोग्यासाठी धोकादायक आहे, अशी माहिती पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी कमीत कमी तीन तर जास्तीत जास्त आठ प्रदुषकांना प्रमाण मानले जाते. त्यात धूलिकण, २.५.१० ओझोन, कार्बन मोना ऑक्साईड, सल्फरडाय ऑक्साईड , नायट्रोजनडाय ऑक्साईड, अमोनिया, लीड ह्या प्रदूषकांना मिळून निर्देशांक काढला जातो.

राष्ट्रीय स्वच्छ व शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत
महानगरपालिका सोलापूर, नागपूर येथील निरी संशोधन संस्था व मुंबई येथील आयआयटी यांच्या सहभागातून कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरातील विविध भागात हरित पट्टे तयार करणे, प्रदूषणाचा स्तर कमी करणे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी प्रोत्साहन देणे, चार्जिंग स्टेशन सुरू करणे आदींसाठी केंद्र सरकारकडून जवळपास २४ कोटी रुपयांचा निधी महापालिकेस प्राप्त झाला आहे. यातून विविध उपाय योजना राबविण्यात येणार आहे. असे उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, निखिल मोरे यांनी सांगीतले

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR