32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeउद्योगफेसबुक, इंस्टाग्रामचा तासाभराचा ब्रेक; झुकरबर्गचे २ लाख कोटीचे नुकसान

फेसबुक, इंस्टाग्रामचा तासाभराचा ब्रेक; झुकरबर्गचे २ लाख कोटीचे नुकसान

सॅन्फ्रान्सिस्को : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम मंगळवारी बंद झाले. त्यामुळे मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग (मार्क झुकरबर्ग नेट वर्थ) यांच्या संपत्तीत सुमारे २ लाख कोटीचे नुकसान झाले.

फेसबुक, इंस्टाग्राम आणि थ्रेड्सच्या युजर्सना मंगळवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लॉगिन करण्यात अडचणींचा सामना करावा लागला. याव्यतिरिक्त, वापरकर्त्यांना त्यांच्या हँडसेटमध्येही स्वत:हून लॉग आऊट झाल्याचा अनुभव आला. अनेक युजर्सनी ही माहिती शेअर केली. त्यानंतर तासाभराने दोन्ही प्लॅटफॉर्म पूर्ववत काम करु लागले. पण तासाभराच्या ब्रेकने देखील त्यांना मोठा फटका बसल्याचे समोर आले.

ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, झुकेरबर्गची एकूण संपत्ती एका दिवसात $२.७९ अब्ज डॉलरने घसरून $१७६ अब्ज झाली. सुमारे ३ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २ लाख कोटी रुपयांचे त्यांचे नुकसान झाले. परंतु असे असले तरी ते जगातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणून कायम राहिले. फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्यामुळे मेटा शेअर्समध्येही १.६ टक्क्यांनी घसरण झाल्याचे दिले. वॉल स्ट्रीटवर मेटा शेअर्स प्रति शेअर $४९०.२२ वर बंद झाले होते.

फेसबुक, इंस्टाग्राम का बंद होते?
डाउन डिटेक्टरवर हजारो लोकांनी वेबसाइट्स डाऊन झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मेटाचे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी सांगितले की, मंगळवारी ही समस्या आली आणि दूरही झाली. सेवा बंद असल्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. तांत्रिक अडचणींमुळे फेसबुक आणि इन्स्टा डाऊन झाले होते, ते आता दुरुस्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR