40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानिवडणुकांमुळे परीक्षांना अडथळे; सीयूईटी, नीट, ‘सीए’ परीक्षा मेमध्ये

निवडणुकांमुळे परीक्षांना अडथळे; सीयूईटी, नीट, ‘सीए’ परीक्षा मेमध्ये

नाशिक : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्वत्र उत्­साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. मात्र या निवडणूक कालावधीत काही परीक्षांना अडथळे निर्माण होण्याची शक्­यता निर्माण झालेली आहे. या निवडणुकीदरम्­यान मे महिन्­यात सीयूईटी, नीट यांसह सीएच्­या विविध स्­तरांवरील परीक्षा नियोजित आहे. यापैकी काही परीक्षांच्­या तारखांमध्ये बदल होण्याची शक्­यता आहे.

दहावी, बारावीच्­या परीक्षा अंतिम टप्प्­यात असून, विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशप्रक्रियेचे वेध लागले आहेत. अनेक अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी परीक्षेचे आयोजन केले जात असते. याआधीच जानेवारी सत्रात जेईई मेन्­स परीक्षा घेण्यात आली. आता एप्रिल सत्रात दुस-यांदा ही परीक्षा नियोजित आहे.

मात्र काही परीक्षा या ऐन लोकसभा निवडणुकीच्­या कालावधीत आल्याने त्­यांच्­या तारखांमध्ये बदल केले जातील का, अशी चर्चा विद्यार्थी, पालकांकडून सुरू झाली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांच्­या प्रवेशासाठी नीट (यूजी) २०२४ ही परीक्षा ५ मेस घेण्याचे नियोजित असून, या तारखेत बदल होण्याची शक्­यता तुरळक आहे.

तर सनदी लेखापाल (सीए) या अभ्यासक्रमासाठी मे-जून सत्रातील परीक्षांच्­या तारखांची घोषणा व्­हायची आहे. त्­यामुळे निवडणूक मतदानाच्­या तारखा वगळून याच महिन्­यात परीक्षा घेत आयोजन संस्­था वेळापत्रक पाळणार असल्­याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

‘एनटीए’तर्फे सीयूईटी-यूजी परीक्षा घेतली जाणार आहे. १५ ते ३१ मे या कालावधीत ही परीक्षा घेतली जाणार असून, या कालावधीत २० व २५ मे या दोन तारखांच्­या दिवशी देशात काही राज्­यांमध्ये मतदान पार पडणार आहे.

महाराष्ट्रातही या तारखेला मतदान होणार आहे. दरम्­यान परीक्षेकरिता नोंदणीची मुदत २६ मार्चपर्यंत असून, दाखल अर्जातील विद्यार्थ्यांच्­या भौगोलिक स्­थिती व निवडणुकांच्­या तारखा यांचा अंदाज घेत आवश्­यकता भासल्­यास परीक्षा तारखेत बदल केले जातील, असे स्­पष्ट करण्यात आले आहे.

एमएचटी-सीईटीतही बदल

राष्ट्रीय पातळीप्रमाणे राज्­यस्­तरावरील काही प्रवेश परीक्षा निवडणूक कालावधीत प्रभावित होण्याची शक्­यता आहे. यामध्ये प्रामुख्याने एमएचटी-सीईटी या परीक्षेचा समावेश आहे. ही परीक्षा १६ ते ३० एप्रिल या कालावधीत होत आहे.

या दरम्­यान राज्­यातील नागपूर, रामटेक, नंदुरबार, धुळे, रावेरसह एकूण ११ मतदारसंघात १९ व २६ एप्रिल या दिवशी मतदान होणार आहे. त्­यामुळे या मतदारसंघांतील विद्यार्थ्यांना संबंधित दिवशी केंद्रावर पोचणे अडचणीचे ठरणार असून, सीईटी सेलला याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR