32.8 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमहाराष्ट्रसोयाबीन घरातच पडून; शेतकरी आर्थिक संकटात

सोयाबीन घरातच पडून; शेतकरी आर्थिक संकटात

जालना : गेल्या अनेक वर्षांपासून निसर्ग शेतक-याची पाठ सोडत नाही. त्यात कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ. यामुळे खरीप आणि रबी हंगामातील सर्वच पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यातच मागील वर्षीपासून सोयाबीनच्या भावात ७० टक्के घट झाली आहे.
त्यामुळे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील शेतकरी मेटाकुटीला आले असून, आर्थिक संकटात सापडले आहेत.

यंदा अत्यल्प झालेल्या पावसामुळे कापूस व सोयाबीनचे उत्पन्न घटले. त्यातच सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी चार हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे.

भाववाढीची प्रतीक्षा करत बहुतांश शेतक-यांनी कापसाची विक्री केली. त्यानंतर कापसाला सरासरी आठ हजारांपर्यंत भाव मिळत आहे. परंतु, त्यातून कपाशीचा खर्चही निघाला नाही. दुसरीकडे दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला ११ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. परंतु, सध्या चार हजार तीनशे रुपयांप्रमाणे सोयाबीन विक्री होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR