38.5 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनजॅकलीन फर्नांडिसच्या इमारतीला आग

जॅकलीन फर्नांडिसच्या इमारतीला आग

मुंबई : मुंबईतल्या वांद्रे पश्चिममधील पाली हिल परिसरात असलेल्या नवरोज हिल सोसायटीला बुधवारी रात्री आग लागली. याच इमारतीत अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिससुद्धा राहते. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीच्या तेराव्या मजल्यातील एका किचनमध्ये ही आग लागली होती.

जॅकलीनचा या इमारतीत ५ बीएचके अपार्टमेंट आहे. रात्री आठच्या सुमारास नर्गिस दत्त रोडवरील या इमारतीला आग लागली होती. तेराव्या मजल्यावरील ही आग चौदाव्या मजल्यापर्यंत पोहोचली होती. जॅकलीन या इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर राहते.

जॅकलीनने गेल्याच वर्षी वांद्रे परिसरातील या इमारतीत आलिशान घर खरेदी केले होते. या घराचा एक व्हीडीओ जुलै महिन्यात सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या इमारतीत विविध रेंजमधील हाऊसिंग पर्याय उपलब्ध आहेत. त्यात सूट्स, पेंटहाऊस, स्काय विला आणि मॅन्शन यांचा समावेश आहे. पाली हिल परिसरात अनेक सेलिब्रिटींची घरं आहेत. यामध्ये सैफ अली खान, करीना कपूर, रणबीर कपूर, आलिया भट्ट यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR