34.5 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडामुनव्वर फारुकीच्या बॉलवर सचिन ‘आऊट’

मुनव्वर फारुकीच्या बॉलवर सचिन ‘आऊट’

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरला मैदानावर आऊट करणं तसं कठीणच. पण ही करामत केलीय मुनव्वर फारुकीने. ‘बिग बॉस १७’चे विजेतेपद पटकावल्यानंतर मुनव्वर चांगलाच चर्चेत आहे.

आधी स्टँडअप कॉमेडी, वादग्रस्त कमेंट्स यामुळे तो चर्चेत असायचा. मात्र ‘बिग बॉस’मुळे त्याच्या चाहतावर्गात वाढ झालेली दिसत आहे. काल इंडियन स्ट्रीट प्रीमिअर लीगचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा सचिन तेंडुलकरसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी मैदानात आले होते. सर्वांमध्ये फ्रेंडली सामने खेळले गेले. तेव्हा मुनव्वर फारुकीच्या बॉलवर सचिन तेंडुलकर आऊट झाला. तेव्हा स्टेडियममध्ये माहोल पाहण्यासारखा होता.

सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेटचा देवच. त्याला काल स्टेडियमवर बॅटिंग करताना पाहून क्रिकेटप्रेमींना खूप आनंद झाला. ३० रन बनवून जेव्हा सचिन आऊट झाला तेव्हा मात्र स्टेडियममध्ये शांतता पसरली. मुनव्वर फारुकीच्या बॉलवर त्याने शॉट मारला. मात्र तो कॅच आऊट झाला. यानंतर सचिनच्या चेह-यावर स्माईल होती. हसत हसतच तो मैदानातून बाहेर गेला. तर इकडे मुनव्वरच्या आनंदाला पारावर उरला नव्हता.

हा सामना सचिन तेंडुलकरच्या मास्टर्स इलेव्हन आणि अक्षय कुमारच्या खिलाडी इलेव्हनमध्ये झाला. १० ओव्हर्सची ही मॅच होती. सचिनने १७ चेंडूत ३० धावा केल्या. अखेर सचिनचीच टीम मॅच जिंकली. मास्टर्स इलेव्हनने ९४ धावा केल्या, तर अक्षयच्या खिलाडी टीमला ८९ धावा करता आल्या. ५ धावांनी त्यांचा पराभव झाला.आयएसपीएल टी-११ च्या ओपनिंग सेरेमनीलाही धमाल आली होती. बोनी कपूर, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमार, रामचरण यांनी ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स केला होता. सचिन तेंडुलकर आयएसपीएलचा ब्रँड अँबेसिडर आहे. ६ मार्च ते १५ मार्च दरम्यान सामने खेळवले जाणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR