41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरपतीच्या गुप्तांगावर चाकूने वार

पतीच्या गुप्तांगावर चाकूने वार

बार्शी : इच्छा नसतानाही लग्न करायला भाग पाडून शारीरिक संबंध ठेवण्यास सक्ती करणा-या पत्नीने पतीच्या गुप्तांगावर धारधार चाकूने वार करून जखमी केले. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बार्शी बसस्थानकासमोरील एका लॉजवर ही घटना घडली. याप्रकरणी संबंधित महिलेवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे.

जखमी पतीने बार्शी पोलिसांत याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. फिर्यादीत म्हटले आहे की, बीड येथे फिर्यादीचे मोबाइल दुकान असून संशयित आरोपी महिलेशी जाण्यायेण्याने ओळख झाली व नंतर प्रेमात रूपांतर झाले. पहिले लग्न झाले असतानाही तिने फिर्यादीची इच्छा नसतानाही लग्न करण्यास भाग पाडले. यानंतर फिर्यादीच्या जवळ न राहता सतत तिचा त्रास सुरू झाला. फिर्यादी व त्यांच्या घरच्यांवर तिने पोलिसांत गुन्हे दाखल केले.

फिर्यादी हे आपल्या बहिणीकडे आले होते. त्यांना भेटायला ये नाही तर गुन्हा दाखल करेन, अशी धमकी तिने दिली. बार्शीतील लॉजवर ते दोघेही भेटले, यावेळी फिर्यादीची इच्छा नसतानाही शरीरसंबंध ठेवण्याची सक्ती करू लागली. यातच फिर्यादीच्या अंगावरील शर्ट काढून तोंडावर टाकला व हातातील धारधार चाकूने गुप्तांगावर जोरदार वार केला. यामध्ये त्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून बार्शी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR