41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeलातूरमध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांचा घसा कोरडा

मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांचा घसा कोरडा

लातूर : प्रतिनिधी
विविध कारणांनी चर्चेत असलेल्या येथील मध्यवर्ती बसस्थानकातील सुविधांचा बोजवारा उडाला आहे. पाणी टंचाईमुळे प्रवाश्यांच्या घश्याला कोरड पडली आहे. मध्यवर्ती बस स्थानकात केवळ पाणी नसल्याने लहान मुले, वृद्ध प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत असून प्रवासी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. शहरातील मुख्य ठिकाण असलेल्या मध्यवर्ती बस स्थानकातून दरोरज हजारो प्रवासी नागरिक प्रवास करीत असतात. लातूरसह विविध जिल्ह्याला जोडलेले हे बस स्थानक आहे.
सध्या कडक उन्हाळा भासत असून लहान मुलासह वयोवद्ध प्रवासांनी या बस स्थानकात मोठी गर्दी सातत्याने असते. तसेच लातूरवरून विविध शहरासह ईतर जिल्ह्यात प्रवासासाठी जोडलेले हे मोठे शहर आहे. या बस स्थानकात रात्रंदिवस वाहनांची मोठी वर्दळ चालू असते. तसेच ग्रामिण भागासह नजीकच्या जिल्ह्यातून ये-जा करणारे शालेय विद्यार्थी, कामानिमित्त आलेले नागरिक यांना पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात पाण्यासाठी कुटलाही आधार नसल्याने प्रवाशासंचे मोठेहाल होताना दिसून येत आहेत. शहरातील बस स्थानकात पाण्यासाठी उभाकरण्यात आलेले पाणी सुधीकरण हे गेल्या काही दिवसापासून दुळ खात पडलेले आहे. त्याकडे कुटल्याही आधीका-याचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. येथील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या रिकाम्या असून याचा फटका प्रवाशी वर्गांना बसत आहे. लाब पल्यावरून आलेल्या प्रवासी वर्गाला बाहेरील हॉटेल कॅन्टीन चा आधार घेत असल्याने हॉटेल धारकांचा धंदा मात्र तेजीत आहे. त्याच बरोबर लाब पल्यावरून आलेल्या बाहेरच्या चालक वाहकांना जेवणाचे डबे धुण्यासाठी पाणी नसल्याने बाहेरील हॉटेलचा आधार घ्यावा लागतो.
तसेच शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील व्यवसाय धारकांना विकतचे पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही. शौचालयाचे दयनीय अवस्था असून त्यातून दुरगंदी पसरल्याने पुरूष व महिला प्रवासी वर्गाचे कुचंबना होत आहे. कधीतरी मणपा प्रशासनाकडुन अधून मधून पाणी सोडले जाते. तेही पाणी पुरेसे नाही. बाहेरील जिल्ह्यासह ग्रामिण भागातून आलेल्या प्रवाशाने येथील दुरवस्था पाहून अधिकारी करतात तरी काय? असा संतप्त सवाल उपस्थित करून तिखट प्रतिक्रीया प्रवासी व्यक्त करत आहेत. तसेच प्रवास करणा-या नागरीकांना पाणीटंचाई होऊ नये यासाठी अधिकारी वर्गाने लक्ष घालून पाण्याची तसेच प्रवाशांच्या सोय व्हावी अशी अपेक्षा प्रवासी वर्गानी एकमतशी बोलताना व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR