36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरपत्नीचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न

पत्नीचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न

सोलापूर- माहेरी आलेल्या पत्नीचा गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पतीविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्नी अश्विनी सागर भोसले (वय २५, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर एक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सागर प्रकाश भोसले (वय ३०, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर ३) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचे लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी ती माहेरी आईच्या घरी राहण्यास आली असता पती सागर हा घराबाहेर येऊन दरवाजा उघड म्हणून जोरात ओरडत होता.

तेव्हा त्याने दरवाजाला लाथ मारून दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. तो फिर्यादीस व तिच्या आईला शिवीगाळ करून माझ्याविरुद्ध पोलिसात तक्रार देते का, मी कोणाला घाबरत नाही, कुठे जायचे तिथे जा, आज तुला संपवतो असे म्हणून त्याने पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशाने तिचा गळा दोन्ही हाताने दाबला, तेव्हा फिर्यादीने जीव वाचविण्याच्या उद्देशाने त्यास ढकलून दिले. त्यावेळी फिर्यादीची आई भांडण सोडवण्याकरता मध्ये आली असता तिलासुद्धा त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. अधिक तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक वालकोळी या करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR