नवी दिल्ली/कोलकाता : केंद्रीय तपास यंत्रणा अंमलबजावणी संचालनालयने आरोप केला आहे की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला आहे. एजन्सीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, कथित कोळसा चोरी घोटाळ्याच्या संदर्भात आय पॅक कार्यालय आणि त्याच्या संचालकांच्या ठिकाणांवर छापा टाकताना मुख्यमंत्री आणि राज्य यंत्रणा बेकायदेशीरपणे घुसल्या.
केंद्रीय एजन्सीने बुधवारी झालेल्या सुनावणीत आपल्या उत्तरात म्हटले आहे की, राज्य पोलिसांच्या वरिष्ठ अधिका-यांनी संगनमत केले आहे आणि ढटछअ अंतर्गत ईडी धिका-यांच्या कामात अडथळा आणला आहे. एजन्सीने आरोप केला आहे की हे सर्व पश्चिम बंगाल राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी केले गेले आहे. ईडीने आय-पॅक छाप्याच्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडून करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ईडीचा आरोप आहे की, ८ जानेवारी रोजी आय-पॅकच्या कार्यालयांवर छापा टाकताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बंगाल पोलिसांच्या अधिका-यांनी त्यांच्या कारवाईत अडथळा आणला.
सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १८ मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. यापूर्वी ३ फेब्रुवारी रोजी सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने १५ जानेवारी रोजी म्हटले होते की, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या चौकशीत अडथळा आणणे हा खूप गंभीर मुद्दा आहे.

