38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनस्टेडियममध्ये सिगारेट ओढताना दिसला शाहरूख

स्टेडियममध्ये सिगारेट ओढताना दिसला शाहरूख

नवी दिल्ली : कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल २०२४ च्या त्यांच्या पहिल्याच सामन्यात ईडन गार्डन्सवर सनरायझर्स हैदराबादविरुध्द जबरदस्त फलंदाजी आणि गोलंदाजी करत विजय मिळवला. केकेआरचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेलने गोलंदाजांची धुलाई करत षटकारांचा वर्षाव केला. रसेलसह कोलकात्याच्या फिलिफ सॉल्ट, रमणदीप आणि रिंकू सिंग या फलंदाजांच्या कामगिरीने केकेआरचे चाहते खूश झाले. शिवाय केकेआरचा संघाचा मालक आणि बॉलीवूड स्टार शाहरुख खानचेही सामन्याला हजेरी लावून प्रेक्षकांची मने जिंकले. मात्र, स्टेडियममध्ये सिगारेट ओढताना शाहरूख  दिसला या मुळे एकच खळबळ उडाली आहे.

आयपीएलच्या १७ व्या सत्रातील कोलकात्याच्या पहिल्या सामन्यात संघाला पाठिंबा देण्यासाठी शाहरुख खानही उपस्थित होता. यावेळी शाहरुखला पाहून चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्साह संचारला आणि चाहत्यानी शाहरूखच्या नावाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली, असताना शाहरुखनेही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आणि हस्तांदोलन करत फ्लाइंग किस दिले. यावेळी शाहरुखने संघाच्या फलंदाजीचाही आनंद घेतला मात्र यादरम्यान तो अचानक सिगारेटचा धूर उडवताना कॅमे-यात कैद झाला.

स्मोकिंगच्या सवयीमुळे शाहरूख नेहमीच चर्चेत असतो. शाहरुख खान ईडन गार्डन्स स्टेडियमवरही स्वत:ला असे करण्यापासून रोखू शकला नाही. कोलकात्याच्या इनिंगदरम्यान शाहरुख स्टेडियमच्या कॉपोर्रेट बॉक्समध्ये बसून मॅच पाहत होता , यादरम्यान तो सिगारेट ओढताना कॅमे-याच्या नजरेत आला. शाहरुखचा स्मोकिंगचा व्हिडिओ टीव्ही स्क्रीनवर येताच त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, असून अनेक युजर्सनी यावर शाहरुखची निंदा करत अशा सवयीमुळे तरुणांना चुकीचा संदेश मिळतो असे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR