40.6 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeक्रीडाआयपीएल २०२४ मध्ये श्रेयस अय्यर सर्वांत अनुभवी कर्णधार

आयपीएल २०२४ मध्ये श्रेयस अय्यर सर्वांत अनुभवी कर्णधार

मुंबई : कॅप्टन कूल एमएस धोनीने आज चेन्नईचे कर्णधारपद सोडले. सीएसकेची धुरा युवा ऋतुुराज गायकवाड याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. सीएसके आणि बीसीसीआयकडून याबाबतची घोषणा करण्यात आली. दरम्यान आयपीएल २०२४ च्या हंगामात श्रेयस अय्यर केवळ सर्वांधिक अनुभवी कर्णधार असणार आहे.

आयपीएल २०२४ आधी होणा-या फोटोशूटसाठी चेन्नईकडून धोनीऐवजी ऋतुराज गायकवाड पोहचला होता. त्यानंतर धोनीने कर्णधारपद सोडल्याची बातमी वा-यासारखी पसरली. २०२४ मध्ये धोनी फक्त खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याकडेही कर्णधारपदाची धुरा नसेल. त्यामुळे तीन धुरंधर पहिल्यांदाच फक्त खेळाडू म्हणून मैदानात उतरणार आहेत. पण यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वात अनुभवी कर्णधार कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. एमएस धोनीशिवाय भारतीय क्रिकेटमधील दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहलीही फक्त खेळाडू म्हणून यंदा मैदानात उतरतील. २०२१ च्या आयपीएल हंगामानंतर विराट कोहलीने आरसीबीचे कर्णधारपद सोडले होते. गेल्या हंगामात फाफ दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याने नेतृत्व संभाळले होते. त्याशिवाय रोहित शर्माही यंदा कर्णधार नसेल. आयपीएल २०२४ आधी मुंबईने हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.

पहिल्यांदाच तिघांपैकी कुणीही कर्णधार नसेल
२००८ मध्ये आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली. पहिल्याच हंगामात धोनीनं चेन्नईचं नेतृत्व संभाळलं होतं. २०१२ मध्ये विराट कोहलीला आरसीबीचं कर्णधारपद मिळालं. २०१३ मध्ये रोहित शर्माला मुंबईनं कर्णधार केले. २०१७ मध्ये धोनी आयपीएलमध्ये कर्णधार नव्हता, पण रोहित आणि विराट यांच्याकडे धुरा होती. २०२२ च्या सुरुवातीला विराट आणि धोनी कर्णधार नव्हते, पण रोहित शर्मा कर्णधार होता. पण आयपीएलमध्ये पहिल्यांदाच हे तिन्ही खेळाडू एकाचवेळी फक्त खेळाडू म्हणून मैदानात उतरतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR