41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeराष्ट्रीयसुनीता केजरीवाल दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री?

सुनीता केजरीवाल दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री?

व्हीडीओमधून मिळाले स्पष्ट संकेत तर्कवितर्कांना उधाण

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केल्याने देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांना आता २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे केजरीवाल यांच्यावर अटकेची कारवाई होऊन त्यांची तुरुंगात रवानगी झाल्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या दिल्लीचे मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची शक्यता आहे.

सुनीता केजरीवाल यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका व्हीडीओमधून तसे संकेत मिळत आहेत. सुनीता केजरीवाल यांनी शनिवारी तुरुंगात असलेले पती अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीमधील आप कार्यकर्ते आणि दिल्लीवासीयांना उद्देशून पाठवलेला एक संदेश वाचून दाखवला होता. हा संदेश वाचून दाखवताना सुनीता केजरीवाल या अरविंद केजरीवाल ज्या ठिकाणी बसून दिल्लीवासीयांना संदेश देतात त्याच जागेवर बसल्या होत्या. त्यांच्या पाठीमागे तिरंग्यासोबत डॉ. आंबेडकर आणि भगत सिंग यांची छायाचित्रे होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR