40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजन‘गेम चेंजर’चे पहिली गाणे रिलीज

‘गेम चेंजर’चे पहिली गाणे रिलीज

मुंबई : साऊथ चित्रपट क्षेत्रातील दमदार अभिनेता राम चरण हा सर्वात प्रसिद्ध अभिनेता आहे. राम चरणचे चित्रपट क्षेत्रासह विविध क्षेत्रातील लोकांचे चांगले संबंध आहेत.आज राम चरण आपल ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. या दरम्यान राम चरणने आपल्या चाहत्यांना आपल्या वाढदिवसानिमित्त अनोखी भेट दिली असून, त्याचा आगामी ‘गेम चेंजर’ या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज केले आहे.

सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे , ज्यामध्ये राम चरण पत्नी आणि मुलीसोबत तिरूमला मंदिरात दर्शन घेताना दिसत आहे, यावेळी त्याला चाहत्यांनी आणि सुरक्षा कर्मचा-यांनी घेरले आहे. यावेळी राम चरणने पारंपारीक वस्त्र परिधान केले होते तर उपासना गुलाबी रंगाच्या सिल्क साडीत दिसली तिच्या आपल्या मुलीचा चेहरा आपल्या साडीने झाकला होता.

दरम्यान, रामचा वाढदिवस साजरा करण्यात चाहते कोणतीही कसर सोडत नाहीत. राम आणि त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर राम चरणच्या आगामी गेम चेंजर या चित्रपटाच्या पहिले गाणे रिलीज करून निर्मात्यांनी रामच्या चाहत्यांना खुश केले आहे.

गेम चेंजर या चित्रपटात राम रचण सोबत कियारा अडवाणीसह ,अंजली, एसजे सूर्या, जयराम, सुनील, श्रीकांत, समुथिरकानी आणि नस्सर यांसारख्या इतर कलाकारांचाही समावेश आहे. गेम चेंजरचे दिग्दर्शक शंकर यांनी केले आहे. या चित्रपटात राम चरण हे राम मदन या आयएएस अधिका-याची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट कार्तिक सुब्बाराज यांनी लिहिली आहे. तर संगीत धुरा थमन यांनी दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR