34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्यातामिळनाडूतील आण्विक केंद्राजवळ आढळल्या उडत्या तबकड्या?

तामिळनाडूतील आण्विक केंद्राजवळ आढळल्या उडत्या तबकड्या?

चेन्नई : परग्रहवासी जीव, म्हणजेच एलियन्स प्रवासासाठी वापरत असणा-या उडत्या तबकड्या दिसल्याचे दावे जगभरात कित्येक ठिकाणी केले जातात. यावर कित्येक हॉलिवूड आणि बॉलिवूडपट देखील बनवले गेले आहेत. आता तामिळनाडूमधील एका पोलीस अधिका-याने देखील यूएफओ पाहिल्याचा दावा केला आहे.

तामिळनाडूमधील स्थानिक वृत्त माध्यमाने याबाबतचे वृत्त दिले आहे. यूएफओ ट्रॅकर सबीर हुसैन यांनी याबाबत अधिक माहिती दिली. तामिळनाडूमधील कुडानकुलम आणि तिरुनेलवेली या दोन गावांमध्ये यूएफओ दिसले होते. या दोन्ही गावांमध्ये आण्विक प्रकल्प आहेत. पोलिस उपनिरीक्षक कादेर यांनी हे यूएफओ पाहिले होते, आणि त्यांनी याचे दोन व्हिडिओही रेकॉर्ड केले असे या वृत्तात म्हटले आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यात निवृत्त डीजीपी प्रदीप व्ही. फिलिप यांनी देखील उडती तबकडी पाहिल्याचा दावा केला होता. यानंतर दहाच दिवसांनी आपण याठिकाणी यूएफओ पाहिल्याचा दावा सबीर हुसैन याने केला आहे. एवढेच नाही, तर इन्स्पेक्टर कादेर यांनी आपण २०२० सालापासून हे यूएफओ पाहत असल्याची माहिती डीटी नेक्स्टला दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR