26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeराष्ट्रीयआचार समितीच्या बैठकीत मोठा गदारोळ

आचार समितीच्या बैठकीत मोठा गदारोळ

नवी दिल्ली : संसदेच्या आचार समितीच्या बैठकीत गुरुवारी मोठा गदारोळ झाला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासह विरोधीपक्षांचे खासदार ही बैठक अर्धवट सोडून निघून गेले. महुआ मोईत्रा यांना वैयक्तिक प्रश्न विचारण्यात आल्याने त्यांनी सभात्याग केला, असे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. तुम्ही किती वाजता भेटलात, कधी कोणाशी बोललात, हॉटेलमध्ये कोणाला भेटलात, असे प्रश्न महुआ मोईत्रा यांना विचारण्यात आल्याचे विरोधी सदस्यांनी सांगितले. महुआ मोईत्रा यांना अनैतिक प्रश्न विचारण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

समितीची बैठक अर्धवट सोडून विरोधी पक्षाचे खासदार संतापाने बाहेर पडले. त्यांनी भाजपवर जहरी टीका केली. यावेळी महुआ मोईत्राही चांगल्याच चिडलेल्या दिसल्या. महुआ मोईत्रा या बैठकीतून बाहेर पडताना पत्रकारांना म्हणाल्या की, ही कसली बैठक होती? ते सर्व प्रकारचे घाणेरडे प्रश्न विचारत होते. विरोधी नेत्यांपैकी एक बसपा खासदार दानिश अली म्हणाले की, आम्ही बाहेर पडलो कारण मोईत्रा रात्री कोणाशी बोलतात असे प्रश्न विचारले जात होते. याचा अर्थ काय, असे ते म्हणाले. अन्य विरोधी पक्षाच्या खासदारांनी सांगितले की, समितीने मोईत्रा यांना “वैयक्तिक आणि अनैतिक प्रश्न” विचारले आणि एका खासदाराने बैठक सुरु असताना माध्यमांना याची माहिती लीक केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR