34.7 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमनोरंजनमहिला लैंगिक छळापासून सुरक्षित नाहीत

महिला लैंगिक छळापासून सुरक्षित नाहीत

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा डीपफेक अ‍ॅडल्ट व्हीडीओ व्हायरल झाला आहे त्यावर कंगना चांगलीच संतापली असून, कंगना म्हणाली की, यशस्वी असूनही कोणतीही महिला ऑनलाईन गुंडगिरी आणि छळापासून वाचू शकत नाही. दरम्यान जॉर्जिया मेलोनी यांनी या प्रकरणावर आक्षेप घेत अ‍ॅडल्ट पोस्ट प्रकरणी सुमारे एक लाख युरो भारतीय रुपयांत ही रक्कम ९० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन आरोपींनी मेलोनीचा चेहरा एका अ‍ॅडल्ट फिल्म स्टारच्या चेह-यावर लावला आणि अमेरिकन अ‍ॅडल्ट साईटवर अपलोड करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणावर आता अभिनेत्री कंगना राणावतने आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर इटलीच्या पंतप्रधानांची बातमी शेअर केली आणि लिहिले की, कोणतीही महिला लैंगिकता, गुंडगिरी आणि छळापासून वाचू शकत नाही. महिला यशस्वी झाल्या तरी त्या सुरक्षित नाहीत, असे कंगना म्हणाली.

दरम्यान, या प्रकरणावर पोलिस आरोपी व्यक्ती आणि त्याच्या वडिलांची चौकशी करत आहेत, ऑक्टोबर २०२३ मध्ये रिलीज झालेल्या ‘तेजस’ चित्रपटात कंगना शेवटची दिसली होती. यानंतर तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR