नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना टायफॉईडची लागण झाली आहे. एक व्हिडिओ पोस्ट करत दीपके यांनी माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून दिपके यांची तब्बेत खराब आहे. मात्र, प्रकृती खालावलेली असली तरीही उद्दिष्ट साध्य होईपर्यंत आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा येत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दीपके यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नव्हती. रक्ताच्या चाचणी अहवालानुसार मला टायफॉईडचे निदान झाले असून दररोज सकाळी आणि संध्याकाळी सलाईनद्वारे उपचार सुरू आहेत. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यानंतरही देशभरात अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणा-या माझ्या सर्व समर्थकांमुळेच हे आंदोलन इतके यशस्वी झाले आहे. याबद्दल मी सर्वांचे मन:पूर्वक आभार मानतो.
या आंदोलनात आतापर्यंत १३० पोलीस कर्मचारी जखमी झाले असून १५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तसेच, सुमारे ६५ विद्यार्थीही जखमी झाले आहेत. जंतर-मंतर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सुमारे १०,००० लोक उपस्थित आहेत आणि तिथे ३००० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
















